Leading International Marathi News Daily

बुधवार, २४ जून २००९

(सविस्तर वृत्त)

दंत व नेत्र तपासणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद
नागपूर, २३ जून/ प्रतिनिधी

 

वातवरणातील वाढत्या प्रदूषणामुळे अनेक नवनवीन आजार पुढे येत आहेत. डोळे शरीराचे महत्वाचे अंग आहे. प्रदूषणाचा डोळ्यावर विपरीत परिणाम होतो. अशा स्थितीत डोळ्यांची योग्य निगा राखणे आवश्यक झाले आहे, असे प्रतिपादन राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे सलील देशमुख यांनी व्यक्त केले.
कोशिश सोशल वेलफेयर फाऊंडेशन, महात्मे नेत्रपेढी, एन.के. पी. साळवे दंत महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने दाभा येथील राधाकृष्ण मंदिरात आयोजित नेत्र व दंत तपासणी शिबिरात ते बोलत होते. या शिबिराला परिसरातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. जवळपास १२०० नागरिकांनी शिबिरात सहभागी होऊन नेत्र व दंत तपासणी करून घेतली. धकाधकीच्या जीवनात आरोग्याकडे दुर्लक्ष केले जाते. त्यामुळे विविध आजार बळावू लागले आहेत. प्रत्येकाने आरोग्याकडे लक्ष दिले तर औषधांवर होणारा खर्च आणि त्रास टाळता येऊ शकेल, असे मत सलील देशमुख यांनी यावेळी व्यक्त केले. शहरात मिहानसारखा प्रकल्प येत असून त्याद्वारे हजारो युवकांना रोजगारांच्या संधी उपलब्ध होणार आहेत. तेव्हा युवकांनी आव्हाने पेलण्यास तयार राहावे, असे देशमुख यांनी सांगितले.
शिबिरात महात्मे नेत्रपेढीचे डॉ. खराबे, डॉ. रंजना पाठक, एन.के.पी. साळवे, दंत महाविद्यालयाचे डॉ. खोब्रागडे, डॉ. एकनाथ धांडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी शिबिरार्थ्यांची तपासणी करून आवश्यक ते मार्गदर्शन केले. संचालन दत्तात्रय कापसे यांनी तर सचिन मोहोड यांनी आभार मानले. आयोजनासाठी सचिन निघूट, उमेश्वर काळे, सुनील खानकुळे, कैलाश दोव्यांदरे, गोविंदराव मेश्राम, चंदू सोनपिंपळे, धवल पंचभाई, सुरेंद्र काळे आदींनी सहकार्य केले.