Leading International Marathi News Daily

बुधवार, २४ जून २००९

(सविस्तर वृत्त)

बियाण्यांच्या खरेदीकडे बळीराजाची पाठ
नागपूर, २३ जून/प्रतिनिधी

 

गेल्यावर्षी सोयाबीनच्या पीकाने हवे तसे उत्पन्न न दिल्याने यंदा शेतक ऱ्यांचा कल पुन्हा एकदा कपाशीकडे असल्याचे बाजारपेठेत सध्या झालेल्या उलाढालीवरून दिसून येत आहे. मात्र, यंदा अजूनही पावसाचा काहीच पत्ता नसल्याने बियाण्यांच्या खरेदीकडेही शेतक ऱ्यांनी पाठ फिरविली आहे. यंदा जून महिना संपता संपता फक्त ६० टक्केच खरेदी झाल्याचे चित्र आहे. पाऊस आणखी लांबल्यास पीक पद्धतीतही बदल होऊ शकतो. त्यामुळे सध्या शेतकरी आण् िव्यापारी दोघेही पावसाकडे डोळे लावून असल्याचे चित्र आहे.
सोयाबीनचे पीक विदर्भातील शेतक ऱ्यांसाठी वरदान ठरले होते. त्यामुळे गेल्या काही वर्षांतील आकडेवारी बघितली तर शेतक ऱ्यांनी सोयाबीनला अधिक पसंती दिल्याचे दिसून येते. प्रत्येक वर्षी सोयाबीनच्या लागवड क्षेत्रात वाढ होत होती. त्यामुळे कपाशीचे पीक घेणाऱ्या अनेक शेतक ऱ्यांनी सोयाबीनला प्राधान्य दिले होते मात्र, गेल्यावर्षी झालेला अपुरा पाऊस आणि त्यातच लष्करी अळीसारख्या रोगांचा प्रादुर्भाव झाल्यामुळे शेतक ऱ्यांना सोयाबीनचे उत्पन्न कमी मिळाले होते. काही शेतकऱ्ऱ्यांना पीक मिळाले, तरी अळीचा प्रादुर्भाव झाल्यामुळे पिकाचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले होते. त्यामुळे यंदा शेतक ऱ्यांचा कल पुन्हा एकदा कपाशीकडे बाजारपेठेत कपाशीच्या बियाण्याला असलेल्या मागणीवरून दिसून येत असल्याचे नागपूर अ‍ॅग्रो डिलर्स असोसिएशनचे सचिव शरद चांडक यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले. मात्र, असे असले, तरी यंदा पावसाचे अजूनही आगमन झाले नसल्याने खरेदीकडे शेतक ऱ्यांनी पाठ फिरविल्याचे चित्र बाजारपेठेत अजूनही फक्त ६० टक्यांच्या आसपास उलाढाल झाल्याच्या आकडेवारीवरून दिसून येते. त्यातच यंदा कपाशीच्या सर्वच वाणांना चांगली मागणी आहे. विशेष म्हणजे बी.जी. २ या बीटी बियाण्याला चांगली मागणी असल्याचे बाजारातून सांगण्यात आले.
दरवर्षी जून महिन्याच्या सुरुवातीला शेतक ऱ्यांची पेरणीची तयारी सुरू होते. यासाठी बियाणे, खते, किटकनाशके खरेदी करण्यासाठी शेतकरी बाजारात गर्दी करतात. बाजारपेठेतही जून महिना हा सर्वाधिक उलाढालीचा महिना असतो. दरवर्षी साधारण जून ते जुलैच्या पहिल्या आठवडय़ात ८० ते १०० कोटींची उलाढाल होते. यंदा हवामान खात्याने मान्सून निर्धारित वेळेत येणार आणि चांगला पावसाचे भाकित वर्तवूनही पाऊस न झाल्याने विक्रेत्यांकडे बियाणे, खते आणि किटकनाशकांचा साठा मोठय़ा प्रमाणात पडून आहे. त्यातच यंदा गेल्यावर्षीपेक्षा खतांचा पुरवठा तुलनेने चांगला आहे. पाऊस आणखी काळ लांबला तर शेतकरी बियाणे खरेदीकडे पाठ फिरवतील आणि त्याचा परिणाम शेतकऱ्यांच्या पीक पद्धती बदलावर होण्याची शक्यता अधिक असण्याची शक्यता चांडक यांनी व्यक्त केली. अशास्थितीत अनेकदा शेतकरी त्यांच्याकडे असलेले बियाणे वापरण्याची शक्यता असते. त्यामुळे सध्या शेतक ऱ्यांप्रमाणेच विक्रेत्यांनाही पावसाची प्रतीक्षा आहे.