Leading International Marathi News Daily

बुधवार, २४ जून २००९

(सविस्तर वृत्त)

जागतिक परिषदेसाठी अशोक थुल ब्राझीलला रवाना
नागपूर, २३ जून / प्रतिनिधी

 

महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी महासंघाचे सरचिटणीस व अखिल भारतीय राज्य सरकारी कर्मचारी महासंघाचे सचिव अशोक थुल ब्राझील मधील ब्रासीलीया शहरात २८ ते ३० जूनदरम्यान आयोजित करण्यात आलेल्या जागतिक श्रमिक संघटनेच्या अकराव्या परिषदेमध्ये भाग घेण्यासाठी रवाना झाले आहेत.
अखिल भारतीय राज्य कर्मचारी महासंघाच्या शिष्टमंडळात तामीळनाडू, केरळ, राजस्थान, प.बंगाल आणि महाराष्ट्रातून प्रत्येकी एका प्रतिनिधींची निवड करण्यात आली आहे. त्यात अशोक थुल यांचाही समावेश करण्यात आला आहे.
टी.यू. आय. ही जागतिक कर्मचाऱ्यांची संघटना असून सेवा क्षेत्रातील सर्व संघटना या संघटनेशी संलग्न आहेत. त्यात भारतातील केंद्रीय कर्मचारी समन्वय समिती, अखिल भारतीय बँक कर्मचारी संघटना, ऑल इंडिया इन्शुरन्स एम्प्लाईज असोसिएशन, अखिल भारतीय राज्य सरकारी कर्मचारी महासंघ यांचा समावेश आहे.
या जागतिक परिषदेत ‘प्रत्येक देशातील सार्वजनिक सेवेची स्थिती’, ‘देशातील श्रमिकांची परिस्थिती’, ‘नवउदारीकरण’, ‘जागतिकीकरण’, या विषयावर प्रामुख्याने चर्चा होणार आहे. जगातील ६२ देशातील विविध कर्मचारी संघटनेचे प्रतिनिधी या परिषदेत सहभागी होणार आहे.
अशोक दगडे, बुधाजी सुरकर, चंद्रहास सुटे, नारायण समर्थ, माधवी जयपूरकर, अरविंद नगरकर, प्रशांत शाहाकार, ज्ञानेश्वर महल्ले, नंदा क्षीरसागर, शुबधा बक्षी, गोपिचंद कातोरे या विविध कर्मचारी संघटनेच्या नेत्यांनी सुटे यांचे अभिनंदन केले आहे.