Leading International Marathi News Daily

बुधवार, २४ जून २००९

(सविस्तर वृत्त)

नागपूर जिल्ह्य़ात ११८ गावे स्वयंघोषित तंटामुक्त!
हिंगणा, २३ जून / वार्ताहर

 

महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेंतर्गत २००८-०९ या वर्षात नागपूर जिल्ह्य़ात १०४ नवीन गावे तर मागील वर्षीचे पुरस्कारपात्र १४ अशी एकूण ११८ गावे स्वयंघोषित तंटामुक्त झाली आहेत.
या स्वयंघोषित तंटामुक्त गावांचे मूल्यमापन सुरू झाले असून ते २४ जूनपर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे. सर्व तंटामुक्त गावांचा अहवाल २५ जूनला जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालयात सादर करण्यात येणार आहे.
महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेंतर्गत जिल्हा मूल्यमापन समितीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. तहसीलदार यांच्या अध्यक्षतेखालील मूल्यमापन समितीत ठाणेदार, पंचायत समिती सभापती, विधी अधिकारी व पत्रकार सदस्य आहेत. काटोल समितीकडून सावनेर व कळमेश्वर तालुक्यातील सावनेर ठाण्याच्या हद्दीतील परसोडी, आदासा, हरदोली, मांडवी, मढासांवगी, निळगाव, कुसुंबी, सिल्लोरी, बोरुजवाडा या ९ गावांचे मूल्यमापन ए.आर. झलके, के.बी. गवई, शालिनी सलाम, श्यामसिंग चव्हाण, विजय कडू हे सदस्य करतील.
रामटेक तालुका व ठाण्याच्या हद्दीतील सोनपूर, निसतखेडा, किरणापूर, भिल्लेवाडा, येरला, सोनेघाट, खैरी बिजेवाडा, भोजापूर, बोंदरी, नंदापुरी या दहा गावांचे मूल्यमापन पारशिवनीच्या समितीतील शिवराज पडोळे, आर.एस. मेश्राम, शरद डोनेकर, एस.जी. इंगळे, राकेश कभे हे सदस्य करतील. कुही व उमरेड तालुक्यातील कुही पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सातारा, साळवा, अडम, वग, बानोर, तितूर, निरव्हा, उटी, हळदगाव, बोरगाव (कलांद्री) या दहा गावांचे मूल्यमापन कामठी समितीचे ए.एच. माडवे, एस.आय. भोयर, रामकृष्ण वंजारी, शेख अनवर अहमद, सुदाम राखडे करतील.
उमरेड व भिवापूर तालुक्यातील उमरेड ठाण्याच्या हद्दीतील सेव, शिरपूर, खुर्सापार, शिवापूर, बोटेझरी, नाडशिवणफळ व भिवापूर ठाण्याच्या हद्दीतील पिरावा, उखळी, सालेभट्टी, आलेसूर या दहा गावांचे मूल्यमापन हिंगणा समितीचे एम.व्ही. पोटे, अशोक बागुल, रेखा आष्टणकर, अर्चना सोनारे, संजय खडतकर आदी सदस्य करतील.
कुही तालुक्यातील वेलतूर ठाण्याच्या हद्दीतील सोनेगाव, किन्ही, बोरी (नाईक), देवळीकला, माजरी, देवळी (खुर्द), कऱ्हांडला, विरखंडी, राजोला व भिवापूर तालुक्यातील मरूपार या गावांचे मूल्यमापन उमरेड समितीचे प्रवीण फुलारी, मधुकर गीते, वनिता हटवार, अनिल बिहाउत, रामकृष्ण जुनघरे आदी सदस्य करतील.
कळमेश्वर तालुक्यातील व ठाण्याच्या मोहगाव (सावंगी), सुसुंद्री, वरोडा, सावंगी (शेतकी), झुनकी (सिंदी), तोंडाखैरी, आष्टीकला, निमजी व नागपूर ग्रामीण तहसीलच्या हद्दीतील सातनवरी या ९ गावांचे मूल्यमापन नरखेड समितीचे एस.के. अवघड, जी.आर. कंकाळे, नरेश अरसडे, व्हि.जे. उके, आनंदराव गुरमुळे आदी सदस्य करतील.
काटोल तालुक्यातील व ठाण्याच्या हद्दीतील सिरसावाडी, हातला, पारडी (गोतमारे), येणवा, कळंभा, तपनी, मेंडकी, पारडसिंगा, अंबाळा (सोनक) आदी ९ गावांचे मूल्यमापन कळमेश्वर समितीचे सुशील वैद्य, व्ही.एस. वांदीले, प्रकाश टेकाडे, अ‍ॅड. निंबाळकर, चंद्रशेखर श्रीखंडे आदी सदस्य करतील.
मौदा तालुक्यातील माथनी, बोरगाव, पावडदौना, धामणगाव, नरसाळा, पिंपरी, कामठी तालुक्यातील आडका, टेमसना, पारशिवनी तालुक्यातील बोरिसिंगोर आदी ९ गावांचे मूल्यमापन रामटेक समितीचे एस.जी. समर्थ, बी.आर. खंडारे, पार्वता वासनिक, राऊत, धनंजय बारोकर आदी सदस्य करतील.
नरखेड तालुक्यातील मोगरा (टोयापार), पिंपळगाव (वखाजी), येणीकोणी, आग्रा, वडेगाव (उमरी), येरला (पावडे) व काटोल तालुक्यातील चारगाव, कोंढासावळी, वंढलीवाघ आदी गावांचे मूल्यमापन सावनेर समितीचे संतोषराव देशमुख, एम.एन. कोटनाके, गुणवंतराव चौधरी, रामभाऊ धोटे, बाबाराव टेकाडे आदी सदस्य करतील.
काटोल तालुक्यातील गोंडी मोहगाव, खुटांबा, इसापूर, वंडली (सावरकर) कामठी तालुक्यातील मौदा पोलीस ठाणाच्या हद्दीतील वरंभा, नानामांगली, दिघोरी (काळे), मौदा तालुक्यातील अरोली ठाण्याच्या हद्दीतील बेडेपार या ८ गावांचे मूल्यमापन भिवापूर समितीचे एस.ए. मोटघरे, डी.एम. अलोने, नंदा नारनवरे, प्रभाकर नागोसे, पुरुषोत्तम भिसीकर आदी सदस्य करतील.
नागपूर तालुक्यातील कळमेश्वर ठाण्याच्या हद्दीतील खडगाव, खंडाळा, चिचोली व कळमेश्वर तालुक्यातील सावनेर ठाण्याच्या हद्दीतील पानउबाळी, पिपळा (किनखेडे), कनियाडोह या ६ गावांचे मूल्यमापन कुही समितीचे जी.ए. पाजनकर, दीपक कोळी, यशोधरा नागदेवे, प्रदीपकुमार पांडे, भालचंद्र गांगलवार आदी सदस्य करतील.
सावनेर तालुक्यातील खापा ठाण्याच्या हद्दीतील वेलतूर, भेंडाळा, केळवद ठाण्यातील सालई, जोगा, नागपूर ग्रामीण तालुक्यातील खापरखेडा ठाण्याच्या हद्दीतील घोघली, कोंढाळी ठाण्याच्या हद्दीतील घुबडी, भरमसूर, वाई-खुर्द (काटोल), धानोली-कवडस (िहगणा), सावंगा (शिवा), (नागपूर) आदी दहा गावांचे मूल्यमापन मौदा समितीच्या अल्का शिंगाळे, डी.एस. बिजवे, विमला परतेकी, मधुकर तिघरे, रघुनाथ तिजारे आदी सदस्य करतील.
कुही तालुक्यातील व ठाण्याच्या हद्दीतील भटरा, आकोली, डोडमा, मांढळ, वडेगाव (मांढळ), पारडी, आंबाडी, कामठी तालुक्यातील अजनी व पारशिवनी तालुक्यातील कन्हान ठाण्याच्या हद्दीतील निलज या ९ गावांचे मूल्यमापन नागपूर (ग्रामीण) तालुक्याचे अशोक फेंडरकर, डी.ए. ठोसरे, प्रमिला पवार, पंकश शेंडे, एस.एस. फालके आदी सदस्य करतील.