Leading International Marathi News Daily

बुधवार, २४ जून २००९

(सविस्तर वृत्त)

ग्रामस्वच्छता अभियानातील गावांची उद्यापासून तपासणी
बुलढाणा, २३ जून / प्रतिनिधी

 

संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान, साने गुरुजी स्वच्छ प्रश्नथमिक शाळा व शाहु-फुले-आंबेडकर दलितवस्ती अभियान सन २००८-०९ अंतर्गत जिल्हास्तरीय तपासणी २५ जून ते २९ जून ०९ या कालावधीत करण्यात येणार आहे. यासाठी येणाऱ्या तपासणी पथकाच्या अध्यक्ष शालेय शिक्षणमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पत्नी व जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष शालिनी विखे पाटील आहेत.
ही जिल्हास्तरीय तपासणी समिती २४ जून रोजी अहमदनगर वरून रात्री लोणार येथे येणार आहे. २५ जूनला ही समिती जांभुळ व आरडव (लोणार), शिवणीटाका (सिंदखेडराजा), गिरोली खु. व मंडपगाव (देऊळगावराजा), गोहेगाव व बाऱ्हई (मेहकर) या गावांची तपासणी करणार आहे. २६ जूनला मांडवा (मेहकर) मिसाळवाडी, बोरगाववसू, शेलोडी व खोर (चिखली), दत्तपूर व अजिसपूर (बुलढाणा) या गावांची तपासणी ही समिती करेल. २६ जून रोजी या समितीचा मुक्काम बुलढाणा येथे राहील. २७ जूनला मातला व हतेडी (बुलढाणा) मूर्ती, सारोळा मारुती, पोफळी व जहाँगीरपूर (मोताळा), लासुरा वाकोडी व कुंड खु. (मलकापूर) या गावांची पाहणी समिती सदस्य करतील. २८ जूनला बेलुरा व येऊलखेड (शेगाव) खिरोळा, पळशी व वकाना (संग्रामपूर) गाडेगाव बु. व मांडवा (जळगाव जामोद) व धानोरा विटाळी व वसाडी (नांदुरा) या गावांची पाहणी समिती करेल. २७ व २८ जूनला रात्री या समितीचा मुक्काम शेगाव येथे राहील. २९ जूनला ही समिती राहुड, उमरा व अटाळी (खामगाव) या गावांची तपासणी करणार असून सायंकाळी ५ वाजता बुलढाणा येथे या अभियानाचा निकाल जाहीर करण्यात येणार आहे.