Leading International Marathi News Daily

गुरूवार, २५ जून २००९

व्यापार - उद्योग
(सविस्तर वृत्त)

भारतातील लघु व मध्यम उद्योगांसाठी आशादायी चित्र
‘यूपीएस एशिया बिझनेस मॅनेजमेंट’चे सर्वेक्षण

व्यापार प्रतिनिधी: आíथक मंदीच्या काळातही देशातील लघु व मध्यम उद्योगांसाठी आशादायी चित्रं

 

असल्याचा निष्कर्ष ‘यूपीएस एशिया बिझनेस मॅनेजमेंट’ च्या यावर्षीच्या सर्वेक्षणात काढण्यात आला आहे.
हे सर्वेक्षण ऑस्ट्रेलिया, चीन , हाँगकाँग, भारत, इंडोनेशिया, जपान, कोरिया, मलेशिया, फिलिपाइन्स, तैवान आणि थायलंड या आशियाप्रशांत क्षेत्रातील लघु व मध्यम उद्योगांच्या १२०० अधिकाऱ्यांशी चर्चा करून करण्यात आले आहे.
देशातील लघु व मध्यम उद्योगांचा यावर्षीचा व्यापार (४८ टक्के) अन्य आशियाई देशांच्या तुलनेत सर्वाधिक आहे. यावर्षी २९ टक्के उद्योग कर्मचाऱ्यांच्या संख्येत वाढ करतील असे अपेक्षित आहे. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात सर्वाधिक ३७ टक्के वाढ करतील असे अपेक्षित आहे. त्या खालोखाल बांधकाम (२९ टक्के), आरोग्य (२६ टक्के), उत्पादन (२५ टक्के), वाहन उद्योग (२२ टक्के) अशी क्रमवारी आहे.
भारत व चीन हे जगातील आउटसोìसगचे प्रमुख देश असून, त्यांना वेगात वाढणाऱ्या स्थानिक बाजारपेठांचे पाठबळ मिळत असल्यामुळे सध्याच्या आíथक मंदीचा त्यांच्यावर फारसा परिणाम जाणवत नाही. असाही निष्कर्ष सर्वेक्षणात काढण्यात आला आहे.
भारतातील लघु व मध्यम उद्योगांना परकीय बाजारपेठा उपलब्ध व्हाव्यात यासाठी शासन प्रयत्न करीत नसल्याचे मत ८० टक्के उद्योगांनी व्यक्त केले आहे. वाहतुकीच्या पायाभूत सुविधांचा अभाव, आíथक मंदी, भ्रष्टाचार व गुन्हेगारी व लालफितीचा कारभार या प्रमुख मागण्या असल्याचे निष्कर्ष काढण्यात आले आहेत. सध्याच्या परिस्थितीत ४० टक्के उद्योगांच्या प्रमुखांनी अल्प दरात वित्त पुरवठा व्हावा, यासाठी शासन व आंतरराष्ट्रीय संस्थांनी पुढाकार घ्यावा, असे मत व्यक्त केले आहे.
व्यवसाय वाढीसाठी उच्च मूल्यवíधत उत्पादने व सेवांवर लक्ष पुरविण्याची गरज असून नवीन बाजारपेठांचा शोध, कामकाज व उत्पादनात शिस्त, कुशल कामगारांना प्रश्नेत्साहन आणि नवीन भागीदाऱ्या या गोष्टींची गरज असल्याचे सर्वेक्षणात नमूद केले आहे. हे सर्वेक्षण ६६६.४स्र्२.ूे या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.