Leading International Marathi News Daily

गुरूवार, २५ जून २००९

व्यापार - उद्योग
(सविस्तर वृत्त)

फ्युचर जनरालीतर्फे नवीन ‘फ्युचर आनंद’ पॉलिसी
व्यापार प्रतिनिधी: भारतातील फ्युचर ग्रुप तसेच इटलीच्या जनराली ग्रुप यांनी विमा क्षेत्रात संयुक्तपणे

 

स्थापलेली कंपनी ‘फ्युचर जनराली इंडिया लाइफ इन्श्युरन्स कंपनी’ने आजीवन तसेच एंडोवमेंट अ‍ॅश्युरन्स यांचा मेळ घालणारी ‘फ्युचर आनंद’ पॉलिसी प्रस्तुत केली आहे. दोन पॉलिसींवर होणाऱ्या खर्चापेक्षा अत्यंत कमी गुंतवणुकीत एकाच पॉलिसीवर दुहेरी संरक्षण देणारी ही पॉलिसी म्हणजे देशातील बचतीबाबत दक्ष विमाकर्त्यांसाठी आदर्श पर्याय ठरेल, असा कंपनीचा दावा आहे.
भविष्यातील आर्थिक संरक्षणासाठी परंपरागत संपत्ती निर्मितीची सुविधा देणारी फ्युचर आनंद योजना विमा ग्राहकांना अल्प मुदतीवर हमी रक्कम अधिक गॅरन्टीड अ‍ॅडिशन्स तसेच बोनससह पूर्णावधीचे लाभ देणाऱ्या शॉर्ट टर्म पेमेंटच्या पर्यायासह उपलब्ध झाली आहे. त्याचप्रमाणे वयाच्या ९९ व्या वर्षापर्यंत विमित राहून, पेमेंट मुदत पूर्ण झाल्यावर १२५ टक्के लाइफ कव्हरही ग्राहक प्रश्नप्त करू शकतात. योजनेत प्रीमियम भरण्याची किमान मुदत आठ वर्षे आणि कमाल मुदत २० वर्षे आहे. किमान एक लाख रुपयांच्या हमी रकमेवर फ्युचर आनंद पॉलिसी १२ ते ६२ वर्षादरम्यान वय असणाऱ्या कोणाही व्यक्तिला उपलब्ध होईल.
पॉलिसीच्या पहिल्या पाच वर्षात हमी रकमेवर प्रति वर्ष ३.५ टक्के गॅरन्टीड अ‍ॅडिशन आणि सहाव्या वर्षापासून अतिरिक्त कम्पाउंडेड रिव्हिजनरी बोनसचा लाभ ही योजना प्रदान करते. पॉलिसी मुदतीत विमाकृत व्यक्तिचे निधन झाल्यास गॅरन्टीड अ‍ॅडिशन्ससह हमी रक्कम तसेच सर्व संलग्न बोनस आणि जर टर्मिनल बोनस देय असल्यास एकत्रित लाभ दिला जाईल तर, पेमेंट मुदत पूर्ण झाल्यानंतर मृत्यू ओढवल्यास हमी रक्कम अधिक टर्मिनल बोनससह १२५ टक्के लाभ नामनिर्देशित व्यक्तिला दिला जाईल. पॉलिसीत अतिरिक्त सुरक्षेसाठी पाच वैकल्पिक रायडर्स आहेत, ज्यामध्ये अपघाती मृत्यू, अपघाताच्या परिणामी कायमस्वरूपी अपंगत्व, अपंगत्वाच्या स्थितीत प्रीमियम वेव्हर, क्रिटिकल इलनेस रायडर आणि टर्म अ‍ॅश्युरन्स रायडर आदींचा समावेश समावेश आहे. मोठय़ा हमी रकमेच्या पॉलिसीवर ग्राहक प्रीमिअम रकमेत सवलतही मिळवू शकेल. तीन वर्षानंतर प्रीमियम हॉलिडे ‘ऑटो कव्हर’ हे या पॉलिसीचे खास वैशिष्टय असे आहे की ग्राहक तीन वर्षानंतर पुढल्या दोन वर्षापर्यंत प्रश्न्रीमियम न भरूनही आयुर्विमा संरक्षण अखंडित ठेऊ शकेल.
मॉलअ‍ॅश्युरन्स चॅनल (टं’’ं२२४१ंल्लूीट्ठ ूँंल्लल्ली’) हे फ्युचर जनरालीचे आणखी एक वैशिष्टय़ आहे, ज्यातून देशभरात फैलावलेल्या फ्युचर ग्रुपच्या सर्व रिटेल आउटलेट्सद्वारे आयुर्विमा तसेच सामान्य विमा योजनांच्या विक्रीचे अत्यंत नवे आणि अनोखे पाऊल कंपनीने टाकले आहे.