Leading International Marathi News Daily

गुरूवार, २५ जून २००९

व्यापार - उद्योग
(सविस्तर वृत्त)

‘बजाज अलियान्झ लाइफ’ची ‘इन्व्हेस्ट प्लस’ पारंपरिक विमा योजना
व्यापार प्रतिनिधी: बजाज अलियान्झ लाइफ इन्शुरन्स कंपनीने पारंपरिक पद्धतीची ‘इन्व्हेस्ट प्लस’

 

ही नवी आयुर्विमा योजना बाजारात आणली आहे. ही पारंपरिक पद्धतीची योजना असली तरी ती युनिट निगडित विमा योजनेची (युलिप) संपूर्ण लवचिकता देते आणि प्रत्येक आर्थिक वर्षाच्या सुरुवातीलाच गुंतवणुकीवर किमान निश्चित लाभ जाहीर करते. बाजारातील स्थितीचा परिणाम होऊ न देता हा लाभ पूर्ण वर्षासाठी समान राखला जातो.
असे बजाज अलियान्झ लाइफ इन्शुरन्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी कामेश गोयल आणि प्रश्नॅडक्ट डेव्हलपमेंट विभागाचे प्रमुख अनिल सिंग यांनी नमूद केले आहे.
‘इन्व्हेस्ट प्लस’ योजना युलिप योजनेप्रमाणेच लवचिकता व पारदर्शकता मिळवून देते. यात ग्राहकांना विमा संरक्षण निवडण्याचे स्वातंत्र्य असते. हवे तेव्हा अतिरिक्त विमा हप्ते भरण्याची किंवा पसंतीनुसार विमा हप्ता कमी करण्याचीही मुभा असते. विमा संरक्षणाच्या चुकत्या केलेल्या किमतीच्या १०० टक्क्यांपर्यंत परतावा दिला जातो. विमेदार पॉलिसीवर कर्ज घेऊ शकतो. पॉलिसीच्या ११व्या वर्षापासून पुढे निष्ठा लाभाची भर (लॉयल्टी अ‍ॅडिशन) पडते आणि भरलेल्या प्रत्येक निव्वळ हप्त्याच्या १० टक्क्यांपर्यंत रक्कम जमा होत गेल्याने मुदतपूर्ती मूल्यातही वाढ होत जाते. ही योजना निश्चित मुदतपूर्ती मूल्य (गॅरंटेड मॅच्युरिटी व्हॅल्यू) व निश्चित गुंतवणूक लाभ (गॅरंटेड इन्व्हेस्टमेंट रिटर्न) असे दोन लाभ देते. निश्चित गुंतवणूक लाभ हा दर आर्थिक वर्षाच्या प्रश्नरंभीच जाहीर केला जातो. तर निश्चित मुदतपूर्ती मूल्य हे मुदतपूर्ती तारखेपर्यंत भरलेल्या एकूण नियमित हप्त्यांइतके असते.