Leading International Marathi News Daily

गुरूवार, २५ जून २००९

(सविस्तर वृत्त)

कुलगुरूपदासाठी आता नवे निकष
प्रश्नचार्य, विभागप्रमुखांना संधी
तज्ज्ञांना मात्र बंदी
तुषार खरात
विद्यापीठांमधील कुलगुरूपदासाठी नव्याने निश्चित करण्यात आलेले पात्रता निकष महाविद्यालयीन

 

प्रश्नचार्य तसेच विद्यापीठातील विविध विभागप्रमुखांसाठी फायदेशीर ठरणार आहेत. याउलट प्रशासकीय व्यक्ती, विविध क्षेत्रातील तज्ज्ञ यांच्यासाठी हे सुधारित निकष मारक ठरणार असल्याची. त्यामुळे राज्य सरकारने निश्चित केलेल्या या नव्या पात्रता निकषांबद्दल शैक्षणिक क्षेत्रातून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
कुलगुरू पदासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारासाठी विविध पात्रता निश्चित करण्यात आल्या आहेत. उमेदवार कोणत्याही शाखेतील डॉक्टरेट आणि शैक्षणिक क्षेत्रातील चांगला पूर्वेइतिहास असलेला असावा. विद्यापीठ स्तरावर किंवा नावाजलेल्या संस्थेमध्ये पदवीपूर्व व पदव्युत्तर पातळीवर किमान १५ वर्षाचा अध्यापन आणि संशोधनाचा अनुभव असावा. पीएचडीनंतर आंतरराष्ट्रीय जर्नलमध्ये किमान पाच संशोधन प्रंबंध प्रकाशित झालेले असावेत. प्रश्नध्यापकापेक्षा कमी दर्जा नसलेला आणि विद्यापीठातील विभाग प्रमुख, वरिष्ठ महाविद्यालयाचे प्रश्नचार्य, आंतरराष्ट्रीय अ‍ॅडव्हान्स लर्निग संस्थांचे प्रमुख म्हणून किमान पाच वर्षाचा प्रशासकीय अनुभव असावा. किमान एका महत्त्वपूर्ण संशोधन प्रकल्पाचे काम केलेले असावे. आंतरराष्ट्रीय संस्था किंवा संघटना यांच्या देशाबाहेरील कार्यशाळा, सेमिनार्स किंवा परिषदांमध्ये सहभाग असावा. या प्रमुख अटी कुलगुरू पदाच्या पात्रतेसाठी निश्चित करण्यात आल्या आहेत.
तंत्रज्ञानात्मक कौशल्य, व्यवस्थापकीय कौशल्य, नेतृत्त्व क्षमता इत्यादी गुण ऐच्छिक करण्यात आले आहेत. त्यामुळे पात्रतेचे निकष विद्यापीठांमध्ये कार्यरत असलेल्या विविध विभागप्रमुख तसेच महाविद्यालयांतील प्रश्नचार्याना झुकते माप देणारे असल्याचे बोलले जात आहे. वास्तविक, विद्यापीठांची घडी नीट बसविण्यासाठी शैक्षणिक, संशोधनात्मक ज्ञानाबरोबरच प्रशासकीय अनुभव असलेल्या कुलगुरूंची गरज आहे. प्रभावी व्यक्तिमत्त्व, स्वच्छ प्रतिमा व कर्तव्यकठोर अशा कुलगुरूंची विद्यापीठांना आवश्यकता आहे. विद्यापीठातील विभागप्रमुख व प्रश्नचार्य यांच्याकडे केवळ शैक्षणिक व संशोधनाचे (?) मर्यादित ज्ञान असते. बहुतांशी विभागप्रमुख व प्रश्नचार्य गटातटाच्या राजकारणात सक्रिय असतात. चांगले शैक्षणिक उपक्रम राबविण्याच्या नावाखाली गैरप्रकार करणाऱ्या विभागप्रमुखांची व प्रश्नचार्याची संख्या मोठी आहे. शिवाय, त्यांचे राजकीय लागेबंधेही असतात. त्यामुळे अशा व्यक्तींची कुलगुरू पदावर नेमणूक झाल्यास विद्यापीठाची प्रगती होण्याऐवजी अधोगती होण्याचीच शक्यता अधिक असल्याची नाराजी शिक्षण क्षेत्रातून व्यक्त करण्यात येत आहे.
दरम्यान, मुंबई विद्यापीठासह, पुणे विद्यापीठ, शिवाजी विद्यापीठ (कोल्हापूर), बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ (लोणेरे), यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ (नाशिक) या पाच विद्यापीठातील कुलगुरूंची पदे भरण्यासाठी शोध समिती स्थापन करण्याची प्रक्रिया सुरू आहे. नवीन पात्रता निकषांनुसार ही सर्व पदे भरण्यात येणार आहेत.