Leading International Marathi News Daily

गुरूवार, २५ जून २००९

(सविस्तर वृत्त)

एन. एस. पब्लिसिटीला सलग तिसऱ्यांदा पुरस्कार
प्रतिनिधी

आऊटडोअर अ‍ॅडव्हर्टायझिंग पुरस्कार सोहळ्यात सलग तिसऱ्या वर्षी एन. एस. पब्लिसिटीला

 

‘मीडिया ऑनर ऑफ दी इयर’ पुरस्कार मिळाला. एन. एस. पब्लिसिटीचे के. डी. माहेश्वरी यांनी हा पुरस्कार जाहिरात गुरू आणि ‘ओ अ‍ॅण्ड एम’चे कार्यकारी अध्यक्ष पियुष पांडे यांच्या हस्ते स्वीकारला. जाहिरात क्षेत्र आणि व्यापार-उद्योग जगतातील अनेक दिग्गज या सोहळ्याला उपस्थित होते.
के. डी. माहेश्वरी यांनी जयपूर येथील नारायण सिंह सर्कल येथे बनविण्यात आलेल्या एस्कलेटर फूटओव्हर ब्रिजमार्फत केलेल्या आऊटडोअर अ‍ॅडव्हर्टायझिंगसाठी त्यांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. आऊटडोअर अ‍ॅडव्हर्टायझिंग या गटात सलग तिसऱ्यांदा पुरस्कार मिळवून जयपूर शहराची शान वाढवली आहे. गेल्या १५ वर्षापासून राजस्थानमध्ये एन. एस. पब्लिसिटी कार्यरत असून सातत्याने नवनवीन कल्पना राबविण्यात त्यांचा हातखंडा आहे. डिझायनर अनुप बरतरिया यांच्या सहकार्याने एन. एस. पब्लिसिटीने बस निवारे, पोलीस पोस्ट, टेलिफोन बूथ, कचरा पेटय़ा तसेच बॅकलाइट टॉवर्स उभारणी करण्याचे काम केले
आहे.