Leading International Marathi News Daily

गुरूवार, २५ जून २००९

राज्य

नाटककार महेश एलकुंचवार यांना प्रतिष्ठेचा नागभूषण सन्मान
नागपूर, २४ जून / प्रतिनिधी

भारतीय नाटय़सृष्टीवर सर्जनशील लेखनाची छाप उमटवणारे नामवंत नाटककार आणि प्रतिभावंत साहित्यिक महेश एलकुंचवार यांना प्रतिष्ठेचा नागभूषण सन्मान जाहीर झाला आहे. नागपूर शहराच्या स्थापनेला ३०० वर्ष पूर्ण झाल्याबद्दल स्थापन करण्यात आलेल्या नागभूषण अ‍ॅवॉर्ड फाऊंडेशनच्या वतीने वैदर्भीय गुणवंताला हा सन्मान प्रदान करण्यात येतो. या सन्मानाचे हे सातवे वर्ष असून १ लक्ष रुपये, सन्मानचिन्ह आणि शाल श्रीफळ असे या नागभूषण सन्मानाचे स्वरूप आहे.

धोतरांच्या पायघडय़ा व मेंढय़ांच्या रिंगणाने काटेवाडीत रंगला तुकोबांचा पालखी सोहळा
सुधीर जन्नू
बारामती, २४ जून

संतश्रेष्ठ जगद्गुरू तुकाराम महाराज यांच्या पालखीला बारामती तालुक्यामधील काटेवाडी येथे धोतरांच्या पायघडय़ा आणि मेंढय़ांचे गोल रिंगण सोहळा भाविकांसाठी विलोभनीय असा होता. मेंढय़ांचे रिंगण सोहळा पाहण्यासाठी मात्र तुकाराम महाराजांच्या पालखीच्या भोवताली भाविकांची प्रचंड गर्दी होती. काल मंगळवारी रात्री बारामती शहरातील सांस्कृतिक केंद्रावरचा पालखी मुक्काम पूर्ण करून श्री संत तुकोबांची पालखी आज सकाळी काटेवाडीकडे मार्गस्थ झाली.

बाबासाहेब पुरंदरे यांच्या जीवितास धोका असल्याची तक्रार
हृषीकेश मैंदर्गीकर
पिंपरी, २४ जून

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना न्यायालयामध्ये जाण्यापासून रोखण्यासाठी वारंवार धमक्या येत असल्याची लेखी तक्रार त्यांचे स्वीय सहायक प्रतापराव टिपरे यांनी नुकतीच पोलिसांकडे केली आहे. मराठा सेवा संघ व संभाजी ब्रिगेड या संघटनेच्या कार्यकर्त्यांंकडून पुरंदरे यांना धोका असल्याची माहिती सप्टेंबर २००८ मध्ये प्राप्त झालेली असतानादेखील न्यायालयाने निवडणूक असल्या कारणावरून संरक्षण देण्याचे त्यांना नाकारले होते.

मानकरसह चौघांच्या विरोधात अजामीनपात्र वॉरंट
पुणे, २४ जून / प्रतिनिधी

दहशतीने जमीन बळकाविल्याप्रकरणी नगरसेवक दीपक मानकरसह दत्ता सागरे, सुधीर कर्नाटकी, साधना वर्तक या चौघांविरुद्ध अजामीनपात्र अटक वॉरंट जारी करण्याचे आदेश प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी के.पी. आर. सिंग राठोड यांनी दिले. प्रा. यशवंत नातू यांच्या तक्रारीची दखल घेऊन त्यांच्या वाडय़ातील सहा लाख ६४ हजार रुपयांच्या वस्तूची चोरी केल्याप्रकरणी पोलिसांनी दरोडय़ाचा आणखी एक गुन्हा दाखल केला.

सेतू कार्यालयावर पुन्हा दगडफेक
नाशिक, २४ जून / प्रतिनिधी

महाविद्यालयीन प्रवेशासाठी लागणारे विविध दाखले देण्यास विलंब होत असल्याने संतप्त झालेल्या अज्ञात युवकांनी पुन्हा येथील सेतू कार्यालयावर दगडफेक केल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. काही दिवसांपूर्वीच संतापलेल्या विद्यार्थ्यांकडून या कार्यालयास लक्ष्य करण्यात आले होते. प्रवेशासाठी आवश्यक असणारी प्रमाणपत्र व दाखला मिळविण्यासाठी सध्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात असणाऱ्या सेतू कार्यालयात विद्यार्थ्यांची झुंबड उडाली आहे.

रायगड प्रदक्षिणा मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद
महाड, २४ जून/वार्ताहर

श्री छत्रपती अ‍ॅडव्हेंचर ऑर्गनायझर महाराष्ट्र या संस्थेच्या वतीने १५ वी राज्यस्तरीय रायगड गिर्यारोहण व प्रदक्षिणा मोहीम नुकतीच आयोजित करण्यात आली होती. मुंबईच्या महापौरांनी सन्मानित केलेले अपंग गिर्यारोहक अनिल चाळके यांनी या मोहिमेचे नेतृत्व केले. संपूर्ण राज्यातील गिर्यारोहकांनी या मोहिमेत मोठय़ा प्रमाणावर सहभाग घेतला होता. रायगड जिल्ह्यातील मुरुड-जंजिरा येथील पाच गिर्यारोहकांनी या मोहिमेत विशेष पारितोषिके मिळविली.

अधिकाऱ्यांच्या मनमानीमुळे वसई-विरारमध्ये तीव्र पाणीटंचाई
सोपान बोंगाणे
ठाणे, २४ जून

महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची नियोजनशून्यता आणि पाटबंधारे विभागाच्या गलथान कारभारामुळे वसई-विरार परिसरातील लाखो नागरिकांना सध्या पिण्याच्या पाण्याच्या तीव्र टंचाईला तोंड द्यावे लागत असल्याच्या तक्रारी आहेत. सूर्या प्रकल्पातील तीनपैकी दोन पंप बंद केल्याने ही परिस्थिती उद्भवल्याचा आरोप होत असून येत्या दोन दिवसांत पाणीपुरवठा पूर्ववत न झाल्यास सरकारला मोठय़ा जनक्षोभाला तोंड द्यावे लागेल, अशी परिस्थिती आहे.

‘ब्राह्मण समाजाने एकत्रित व्हावे’
भुसावळ, २४ जून / वार्ताहर

आज जग ज्या वेगाने बदलत आहे, त्यावेगाने सामाजिक बदल देखील बऱ्याचदा अपरिहार्य ठरत असतात. विज्ञानासोबत राहून स्वत:ची, राष्ट्राची आणि समाजाची प्रगती करावयाची असेल तर देशातील सर्व ब्राह्मण समाजाने एकत्रित यावे, असे प्रतिपादन ज्येष्ठ समाजिक कार्यकर्त्यां लीलाताई ओक यांनी केले.
येथील देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण संघातर्फे आयोजित बहुभाषिक व सर्वशाखीय ब्राह्मण वधू-वर परिचय मेळाव्यात त्या बोलत होत्या. यावेळी माजी नगराध्यक्ष देवीप्रसाद शर्मा, डॉ. वसंतराव कुलकर्णी, देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण संघाचे अध्यक्ष गणेश वढवेकर आदी उपस्थित होते.
आपल्या भाषणात ओक म्हणाल्या, की आधुनिक काळात बाह्मण समाजाने देखील बदलले पाहिजे. त्यांनी मुलांच्या अथवा मुलींच्या विवाहप्रसंगी शाखा-उपशाखा असा भेद मानू नये. तसेच एकमेकांना दुय्यम अथवा श्रेष्ठ समजू नये. काळ जसा असतो तसा आपल्यात बदल हा अपेक्षित असतो. पर्यावरण रक्षणासारख्या प्रश्नी ब्राह्मणसमाजाने पुढाकार घेतला पाहिजे, अशी अपेक्षा प्रा. शर्मा यांनी व्यक्त केली.