Leading International Marathi News Daily

गुरूवार, २५ जून २००९

(सविस्तर वृत्त)

किशोरी शक्ती योजनेत मुलींची फसवणूक?
दिलीप शिंदे

शहापूर तालुक्यातील किन्हवली प्रश्नथमिक आरोग्य केंद्रात किशोरी शक्ती योजनेत काम करणाऱ्या

 

मुलींची फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला असून या प्रकरणी ६० मुलींनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे तक्रार करून मानधनाची मागणी केली आहे, तर बँकेत खाती नसल्याने मुलींना मानधन मिळाले नसल्याचा दावा डॉ. संजय काकडे यांनी केला आहे.
किशोरी शक्ती योजनेअंतर्गत वयोवृद्घांची प्रकृती सदृढ राहण्यासाठी ज्युडिअ‍ॅट्रिक क्लिनिक सुरू करण्यात आली आहेत. प्रत्येक गावात हे क्लिनीक दुपारी दोन ते पाच या दरम्यान सुरू असते. व्यायामाचे विविध प्रकार शिकवून वयोवृद्धांना प्रकृतीबाबत जागरूकता निर्माण करण्याचे काम या प्रशिक्षित किशोरी मुलींकडून केले जाते. त्यासाठी प्रत्येक गावामधील ११ वर्षाखालील तीन मुलींची निवड करण्यात आलेली आहे. शहापूर तालुक्यातील किन्हवली प्रश्नथमिक आरोग्य केंद्रामार्फत २० गावांमध्ये ही योजना राबविली जात आहे. त्यासाठी ६० मुलींना प्रशिक्षित करण्यात आले आहे. या कामाच्या मोबदल्यात मुलींना महिन्याकाठी १०० रुपये मानधन दिले जाते. त्यानुसार ऑक्टोबर ०८ ते मार्च ०९ दरम्यान काम केल्यानंतर ६० मुलींना ३६ रुपयांचे मानधन मिळणे अपेक्षित होते. मात्र वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय काकडे यांनी एका प्रशिक्षणाच्या निमित्ताने रजिस्टरवर मुलींच्या स्वाक्षऱ्या घेतल्या आणि तुमचे मानधन पुढील वर्षापासून तुमच्या खात्यावर जमा होईल, असे सांगितले. काही दिवसानंतर मानधनासंबंधी चौकशी केल्यानंतर त्यांना स्वाक्षरी केलेल्या रजिस्टरवर मानधनाचे ६०० रुपये दिल्याची नोंद आढळली. या फसवणुकीची ६० मुलींनी लेखी तक्रार मुख्य कार्यकारी अधिकारी आणि जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याकडे करून चौकशी करण्याची मागणी केली आहे.
दरम्यान, किन्हवली प्रश्नथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय काकडे यांच्या मनमानी आणि अधिकाऱ्यांच्या गैरवापराच्या निषेधार्थ १२ कर्मचाऱ्यांनी सामूहिक रजा आंदोलन पुकारले होते. त्यासंबंधीची तक्रार कर्मचाऱ्यांनी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे करून डॉ. काकडे यांच्यावर कडक कारवाईची मागणी केली आहे. या प्रकरणी चौकशी करून योग्य ती पावले उचलण्याचे आश्वासन मुख्य कार्यकारी अधिकारी वराळे यांनी दिल्यानंतर कर्मचाऱ्यांनी आंदोलन मागे घेतले.
या आरोपांबाबत काकडे यांना विचारणा केली असता ते म्हणाले, किशोरी शक्ती योजनेंतर्गत दर महिना प्रत्येक मुलीला १०० रुपये मानधन दिले जाते. मात्र त्यांनी बँकेत खाते न उघडल्याने ते मानधन जमा करण्यात आलेले नाही. खाते क्रमांक मिळताच मानधनाची सर्व रक्कम जमा होईल. कामचुकार कर्मचाऱ्यांनी कारवाई टाळण्यासाठी कटकारस्थानांतर्गत सामूहिक रजा आंदोलन पुकारले. मुख्यालयात न राहणाऱ्या आरोग्य सहाय्यक धनगर आणि लॅब टेक्निशयन शिंदे यांच्यासह काही कर्मचाऱ्यांना कारणे दाखवाच्या नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. ती कारवाई टाळण्यासाठी हा प्रकार घडला आहे. याबाबत कुठल्याही नागरिकांची तक्रार नाही. यापूर्वी देखील या कर्मचाऱ्यांनी मला बदनाम करून हटविण्याचे प्रयत्न केल्याचे काकडे यांनी सांगितले.