Leading International Marathi News Daily

गुरूवार, २५ जून २००९

(सविस्तर वृत्त)

अमेरिकी विद्यापीठात चमकली ठाण्याची मोनाली नारखेडे
ठाणे/प्रतिनिधी

गेल्या काही वर्षांत शिक्षण क्षेत्रात ठाणे जिल्ह्यातील विद्यार्थी बाजी मारत असून, मोनाली संजीव

 

नारखेडे ही ठाणेकर विद्यार्थिनी न्यूयॉर्क येथील सेंट जॉन विद्यापीठात मास्टर ऑफ फार्मसी अ‍ॅडमिनिस्ट्रेशनच्या परीक्षेत चमकली आहे. विशेष प्रश्नवीण्यासह एम. एम. परीक्षा उत्तीर्ण झाल्याने मोनालीला ‘अ‍ॅकॅडमी एक्सलन्स’ पुरस्काराने विद्यापीठाने गौरविले आहे.
मुंबई विद्यापीठाच्या यूआयसीटीमधून फार्मसीची पदवी घेतल्यानंतर पदव्यत्तुर शिक्षणासाठी तिची सेंट जॉन विद्यापीठात निवड झाली. माणसाचे आयुष्य पोखरून टाकणाऱ्या कर्करोग व मधुमेह या रोगांविषयी मोनालीने सखोल अभ्यास केला असून, वेळोवेळी यावर शोधनिबंध सादर केले आहेत.
मधुमेह रोगावरील उपचारासाठी जागतिक कीर्ती मिळविलेले डॉ. नदीम रईस यांचे तिला मार्गदर्शन लाभले आहे. मधुमेहाविषयी समाजात जनजागृती घडविण्यासाठी डॉ. संजीव नारखेडे व मोनाली यांनी संयुक्तपणे पुस्तक लिहिले असून, त्याची दुसरी आवृत्ती लवकरच प्रसिद्ध होणार आहे. अमेरिकी विद्यापीठात मिळविलेल्या यशाबद्दल तिचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.