Leading International Marathi News Daily

गुरूवार, २५ जून २००९

(सविस्तर वृत्त)

‘बस्ति उपचारा’वर राज्यस्तरीय परिसंवाद
ठाणे/प्रतिनिधी

‘बस्ति उपचारा’वर महाराष्ट्र आयुर्वेद संमेलन व आयुर्वार्ता प्रबोधिनीतर्फे २८ जून रोजी ठाण्यात

 

राज्यस्तरीय परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे. घंटाळी येथील आयुर्वेद व पंचकर्म केंद्रात सकाळी १० ते ५ वेळेत हा परिसंवाद होणार असून, राज्यभरातील वैद्यांसाठी तो खुला आहे.
‘बस्ति’ या पंचकर्म उपचाराविषयी झालेले संशोधन, बस्तिचे आश्चर्यकारक परिणाम, त्याची कारणे, त्याचे प्रकार व आजच्या काळातील बस्तिच्या उपयुक्ततेवरील तज्ज्ञांची चर्चा व मार्गदर्शन परिसंवादात करण्यात येणार आहे.
महाराष्ट्र आयुर्वेद संमेलनाच्या अध्यक्षा डॉ. शशीताई अहिरे यांच्या हस्ते परिसंवादाचे उद्घाटन होईल. डॉ. उदय कुलकर्णी (ठाणे), डॉ. भावसार (ठाणे), डॉ. गोविलकर (विलेपार्ले), डॉ. म्हात्रे (दादर), डॉ. शिंदे (खेड) यांची व्याख्याने याप्रसंगी होणार आहेत. तसेच सर्वसामान्यांच्या माहितीसाठी पंचकर्म उपकरणांचे प्रदर्शन संध्याकाळी ५ ते ८ या वेळेत आयोजित करण्यात आले आहे. नावनोंदणीसाठी संपर्क : डॉ. कुलकर्णी यांचे आयुर्वेद व पंचकर्म केंद्र, ३, रामजानकी निवास, घंटाळी मंदिराशेजारी, नौपाडा, ठाणे (प). फोन-९८६९२०६३६४