Leading International Marathi News Daily

गुरूवार, २५ जून २००९

(सविस्तर वृत्त)

अंबरनाथमध्ये अकरावी ऑनलाइन प्रवेश मार्गदर्शन केंद्र
बदलापूर/वार्ताहर : अंबरनाथ शहर भारतीय विद्यार्थी सेनेच्या वतीने अंबरनाथ पूर्व आणि पश्चिम

 

भागात १४ ठिकाणी अकरावी ऑनलाइन प्रवेश आणि मार्गदर्शन केंद्राची विनामूल्य सोय उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती भाविसेचे तालुका संघटक डॉ. बालाजी किणीकर आणि शहर संघटक राजेश कौठाळे यांनी दिली. शहरप्रमुख अरविंद वाळेकर यांच्या हस्ते या केंद्राचे शहर शाखेमध्ये उद्घाटन करण्यात आले.
या मदत केंद्रामध्ये विद्यार्थ्यांना प्रवेश नोंदणी आणि प्रिंटआऊट मोफत देण्यात येणार आहेत. संपर्क-९४२३०९०७३२
दरम्यान, बदलापूर येथील अकरावीच्या विद्यार्थ्यांना ऑनलाइन प्रवेशासंदर्भात माहिती केंद्र सुरू करण्यात आल्याची माहिती नगरसेवक राजन घोरपडे यांनी दिली.
नगराध्यक्ष राम पातकर यांच्या हस्ते या केंद्राचे उद्घाटन झाले असून, हेंद्रेपाडा येथील गुरुराज सोसायटी येथील जनसंपर्क कार्यालयात माहिती मिळणार आहे.