Leading International Marathi News Daily

गुरूवार, २५ जून २००९

(सविस्तर वृत्त)

माणसाचे जीवन म्हणजे काव्यखंडच - मधुकर जोशी
डोंबिवली/प्रतिनिधी

माणूस हा जन्मापासून कविता जगत असतो. पण त्याला हे समजतच नाही, कविता मी

 

विणकरासारखा लिहीत गेलो, पण त्याचा कधी धंदा केला नाही, असे मत ज्येष्ठ कवी मधुकर जोशी यांनी नुकतेच येथे व्यक्त केले.
रोटरी क्लब डोंबिवली पूर्वतर्फे मधुकर जोशी यांना रोटरी जीवन गौरव व ज्येष्ठ पत्रकार आबासाहेब पटवारी यांना समाजभूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी डॉ. उल्हास कोल्हटकर, अभय कोठरे, श्रीप्रकाश रायकर उपस्थित होते.
जोशी म्हणाले, माझे आयुष्य मी कविता लिहिण्यात घालवले. जशी रसिकांकडून मागणी आली त्याप्रमाणे कविता लिहिल्या. लेखकासारखा कवी रसिकांच्या लक्षात राहत नाही. कविता लिहिण्यासाठी मला कुसुमाग्रजांकडून प्रश्नेत्साहन मिळाले.
आयुष्यातील सुख-दु:खाचे अनुभव मला कविता लिहिण्यास हात देत गेले. कविता लिहून दिल्यानंतर कोणी पैसे देत नाही, आणि कवितांचा मी कधी धंदा केला नाही, असे ते म्हणाले.
पटवारी म्हणाले, जो शालीन, सौम्य व्यक्तिमत्त्वाचा असतो, तो समाजभूषण. हा मान जोशी यांना मिळाला याचा मनस्वी आनंद होत आहे.
सूत्रसंचालन श्रीप्रकाश रायकर यांनी, तर कोठारी यांनी आभार मानले. यावेळी जोशी यांच्या कवितांवर आधारित गाण्यांचा कार्यक्रम दीपक परांजपे आणि सहकाऱ्यांनी सादर केला.