Leading International Marathi News Daily

गुरूवार, २५ जून २००९

(सविस्तर वृत्त)

मालावीच्या शिष्टमंडळाची बदलापूरच्या पालिकेस भेट
बदलापूर/वार्ताहर: दक्षिण आफ्रिकेतील मालावी देशातील सात जणांच्या एका शिष्टमंडळाने

 

नुकतीच बदलापूर नगर परिषदेला भेट देऊन पालिकेच्या कामकाजाची माहिती जाणून घेतली.
मालावी या लोकतांत्रिक देशामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या संदर्भात नवीन कायद्यांची रूपरेषा ठरविण्याचे काम सध्या सुरू आहे. या अंतर्गत जर्मन संस्थांच्या जी. टी. झेड आणि डीईडीचे सात सदस्यीय पथक आले होते. रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीच्या आर. एम. पी. विदेश आणि पुण्याच्या ड्रॉप या स्वयंसेवी संस्थेच्या वतीने नगर परिषद भेटीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.मालावीच्या नगररचना विभागाचे हेस्टिंग बोटा, फ्रँक हार्कफूट, एस्मी जेरी, डोग्लास मक्वेटा, वॉल्संग केरिया आदींचा या शिष्टमंडळात समावेश होता.
नगरपालिकेचे मुख्याधिकारी सुदाम धुपे यांनी पालिका प्रशासनाच्या वतीने पाहुण्यांचे स्वागत केले.
नगर परिषदेमार्फत शहरात राबविण्यात येत असलेल्या विविध प्रकल्पांची तसेच लोकप्रतिनिधींच्या कार्याची माहिती वास्तू शिल्पकार सतीश ओक यांनी दिली. भारतातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये होणारी लोकप्रतिनिधींची निवड कशी होते आणि त्यांचे कार्य याविषयी हेस्टिंग बोटा यांनी विचारलेल्या प्रश्नाला पालिका सदस्य मनोज वैद्य आणि संभाजी शिंदे यांनी उत्तरे दिली.