Leading International Marathi News Daily

गुरूवार, २५ जून २००९

(सविस्तर वृत्त)

पिकांची नासाडी करणाऱ्या वन्यप्रश्नण्यांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
यवतमाळ, २४ जून / वार्ताहर

वन्य प्रश्नण्यांकडून पिकांची नासाडी होणाऱ्या शेतकऱ्यांना दिली जाणारी नुकसान भरपाई अल्प

 

आहे. विदर्भात सर्वाधिक नुकसान यवतमाळ जिल्ह्य़ात होत असल्याची धक्कादायक माहिती आहे. वन्य प्रश्नण्यांचा कायम स्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
वन्यपशूंच्या होणाऱ्या त्रासाने शेतकऱ्यांच्या संकटात आणखीनच भर टाकली आहे. विशेषत: जंगलाला लागून असलेल्या शेतीत रोही, निलगाय, हरणे, रानडुक्कर इत्यादी वन्यपशू धुडगूस घालतात आणि शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे पीक उध्वस्त करतात. रानडुक्कर आणि रोही या प्रश्नण्यांपासून पिकांचे संरक्षण व्हावे म्हणून शेताला काटेरी कुंपण घालून त्यात वीज प्रवाह सोडण्याचे जीवघेणे प्रयोग झाले आहे. काही ठिकाणी रानडुकरांना ठार मारण्यासाठी गावठी बॉम्ब शेतात पेरण्याचे ही अमानुष प्रकार झाले आहेत. या गावठी सुतळी बॉम्बला कृषी पदार्थ समजून डुक्कर जेव्हा खातात तेव्हा बॉम्बचा स्फोट होऊन डुक्कराचा जबडा छिन्नभिन्न होऊन डुक्कर तडफडत मृत्युमुखी पडते पण, असले अमानुष प्रकार करणे हाही गुन्हा असल्याने, त्रासदायक व पीक नासाडी करणाऱ्या वन्य प्रश्नण्यांचा बंदोबस्त कसा करावा, असा मोठा गंभीर प्रश्न शेतकरी व वन खात्यासमोर उभा आहे.
यवतमाळ जिल्ह्य़ात ९ लाख हेक्टरपैकी चार लाख हेक्टरमध्ये कापूस आणि साडे तीन लाख हेक्टरमध्ये सोयाबीन घेतले जाते. उर्वरित दीड लाख हेक्टरमध्ये दाळवर्गीय पिके घेतली जातात तर काही भागात ऊस लागवडही केली जाते. ज्यांची जमीन जंगलाला लागून आहे अशा शेतकऱ्यांचे दरवर्षी लाखो रुपयांचे नुकसान वन्यप्रश्नणी करीत असतात त्या त्रासापायी हजारो एकर जमीन पडिक राहते आणि शेतकऱ्यांवर उपासमारीची पाळी येते.
शासनाच्या वनखात्याकडून वन्यपशूंकडून शेतातील होणाऱ्या पीक नासाडी बद्दल हेक्टरी फक्त दोन हजार रुपये आणि अधिकतम म्हणजे जास्तीतजास्त पाच हजार रुपयांपर्यंत नुकसान भरपाई दिली जाते. जिल्ह्य़ात पांढरकवडा, यवतमाळ आणि पुसद असे वनविभागाचे तीन विभाग आहेत. गेल्यावर्षी वन्यप्रश्नण्यांनी केलेल्या पीक नासाडी बद्दल शेतकऱ्यांना लाखो रुपयांची नुकसान भरपाई देण्यात आली असली तरी ती नुकसानभरपाई म्हणजे ‘उंट के मुंह मे जिरा’ या स्वरूपाची असल्याची शेतकऱ्यांची प्रतिक्रिया आहे. विशेष बाब म्हणजे वन्यप्रश्नण्यांच्या हमल्यात शेतकऱ्यांच्या गुराढोरांचा मृत्यू झाला असल्यास त्याबद्दलही नुकसान भरपाई मिळते आणि एखाद्या वन्यप्रश्नण्याने मानवाला जखमी केले असेल तर वेगळी नुकसान भरपाई दिली जाते.
मानवप्रश्नण्याचा मृत्यू झाला असेल तर दोन लाख रुपये सानुग्रह मदत त्याच्या वारसदारांना मिळते. यवतमाळात असे ‘जखमी’ आणि ‘मृत्यू’ होण्याच्या घटनाही घडल्या आहेत आणि वन विभागाने त्यापायी लाखो रुपये दिले व अजून काही जणांना द्यावयाचे आहेत. हा सारा प्रकार दरवर्षी सुरू आहे पण, कायमस्वरूपी बंदोबस्ताची मात्र अद्याप कोणतीच योजना झाली नाही व सरकारी मदतीत वाढही झाली नाही.
निसर्गशेतीचे समर्थक अनंत जोगळेकर यांनी ‘लोकसत्ता’ ला सांगितले की, वन्यप्रश्नण्यांनी हजारो एकरात शेत पिकांचे नुकसान केले आहे. त्याबद्दल नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी करणारे अर्ज किती आहेत? तर एक खोलीभर अर्जाचा ढीग आहे यावरून हे प्रकरण किती गंभीर आहे याची कल्पना येईल. मात्र, दुर्दैवाने या अत्यंत ज्वलंत आणि शेतकऱ्यांच्या व राष्ट्राच्या दृष्टीने महत्त्वाच्या विषयाकडे सरकार व राजकीय पक्षांचे लक्ष नाही.