Leading International Marathi News Daily

गुरूवार, २५ जून २००९

(सविस्तर वृत्त)

मुलीची छेड काढणाऱ्यांना नागरिकांनी बदडले
चिमूर, २४ जून/ प्रतिनिधी

चिमूर तालुक्यातील भान्सुली येथून संगणक प्रशिक्षणाकरिता खडसंगीला येणाऱ्या मुलींना रस्त्यात

 

अडवून छेड काढणाऱ्या दोन तरुणांना बसस्थानकावर नागरिकांनी चांगलाच चोप दिला. यावेळी त्या मुलीनींही चपलांचा प्रसाद दिला.
भान्सुली येथून खडसंगी येथे चार किलोमीटरवर शिक्षणाकरिता यावे लागते. प्रवासाचे दुसरे कोणतेही साधन नसल्याने मुलामुलींना दररोज सायकल तथा पायीच खडसंगीला यावे लागते.
भान्सुली येथील चार मुली दररोज खडसंगीला संगणक प्रशिक्षणाकरिता येतात. याचा गैरफायदा घेत रोड रोमीओचा आव आणणारे मजनू त्यांना त्रास देत होते.
मागील आठ दिवसांपासून या मुलींच्या मागे दोघांची टोळी लागली होती. या दोघांनी मुलींना शिवीगाळ केली. बुधवारी सकाळी ८.३० वाजता या मुलांनी पुन्हा छेड काढली. ही घटना मुलींनी खडसंगीच्या नागरिकांना सांगितली.
त्या मुळे नागरिकांनी खडसंगी बस स्थानकावर अशोक महीपाल मेश्राम (२१) व प्रितम विठ्ठल मेश्राम (२०) यांना चांगलेच बदडून काढले.
खडसंगीच्या सरपंच नम्रता वासनिक यांनी लागलीच घटनेची माहिती चिमूर पोलीस ठाण्याला दिली .पोलिसांनी तातडीने घटणास्थळी पोहचून मुलीची छेड काढणाऱ्या दोघांना पकडले. पोलिसांनी दोघांनाही गजाआड केल् असून पुढील तपास सुरु आहे. या घटनेमुळे परिसरातील मुलीव त्यांच्या पालकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.