Leading International Marathi News Daily

गुरूवार, २५ जून २००९

(सविस्तर वृत्त)

शहीद जवान अजीत दासवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
चंद्रपूर, २४ जून/प्रतिनिधी

छत्तीसगड राज्यातील दंतेवाडा जिल्ह्य़ात नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात शहीद झालेल्या येथील जवान

 

अजीत माधव दास (२७) याच्यावर वलनी येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.
चंद्रपूर-मूल मार्गावर बोर्डा या गावापासून काही कि.मी. अंतरावर असलेल्या वलनी येथील रहिवासी असलेला अजीत दास हा ‘सीआरपीएफ’ मध्ये होता.
चार दिवसांपूर्वी १९ जून रोजी शेजारील छतीसगड राज्यातील दंतेवाडा जिल्ह्य़ात सीआरपीएफ जवानांना घ् ोऊन जात असलेला ट्रक नक्षलवाद्यांनी उडवला. यामध्ये ११ सीआरपीएफचे जवान शहीद झाले. यामध्ये अजीत दास देखील होते.
नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात दंतेवाडा जिल्ह्य़ात अजीत शहीद झाल्याची वार्ता दोन दिवसांपूर्वी गावात पोलिसांनी दिली. तेव्हापासून गावात सर्वत्र शोककळा पसरली होती.
सोमवारी मध्यरात्री दोन वाजता अजीत यांचे पार्थिव चंद्रपूर जिल्ह्य़ातील वलनी येथे आणण्यात आले. यानंतर सकाळी शासकीय इतमामात अजीतच्या पार्थिवावर अंतिम संस्कार करण्यात आले.
यावेळी जिल्हा प्रशासन, पोलीस दलातील सर्व वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी व गावकरी हजर होते.