Leading International Marathi News Daily

गुरूवार, २५ जून २००९

(सविस्तर वृत्त)

राष्ट्रपती दौऱ्याच्या तयारीचा पालकमंत्र्यांकडून आढावा
बुलढाणा, २४ जून / प्रतिनिधी

जुलै महिन्यात होणाऱ्या राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांच्या चिखली व बुलढाणा दौऱ्याच्या तयारीचा

 

आढावा पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी नुकताच घेतला. दौऱ्याच्या पाश्र्वभूमीवर तयारीचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय सभागृहात बैठक झाली.
या बैठकीस जिल्हाधिकारी ज्ञानेश्वर राजूरकर, निवासी उपजिल्हाधिकारी दिनेशचंद्र वानखडे, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी बी.एन. उबाळे उपस्थित होते.
बांधकाम विभाग, विद्युत विभाग, आरोग्य विभाग, पोलीस विभाग आदींनी सुरू असलेल्या तयारीबाबत पालकमंत्र्यांना माहिती दिली. चिखली येथे महाराणा प्रताप यांच्या पुतळ्याचे अनावरण व बुलढाणा येथे जिल्हा सत्र न्यायालयाच्या शताब्दी महोत्सवाला राष्ट्रपती उपस्थित राहणार आहेत.
सदर दौरा ऐन पावसाळ्यात असल्यामुळे येणाऱ्या अति महत्त्वाच्या व्यक्तींची कुठलीही गैरसोय होता कामा नये, याची दक्षता घेण्याचे निर्देशही त्यांनी दिले.