Leading International Marathi News Daily

गुरूवार, २५ जून २००९

(सविस्तर वृत्त)

नॅशनल कराटे सेंटरचे पुरस्कार वितरण
वर्धा, २४ जून / प्रतिनिधी

ज्युडो- कराटे हा खेळ मुलामुलींमध्ये समयसूचकता व कणखरपणा निर्माण करतो. प्रगतीचे ध्येय

 

ठेवणाऱ्या प्रत्येकाने ही कला शिकावी, असा सल्ला पोलीस अधीक्षक अश्वती दोरजे यांनी दिले.
नॅशनल कराटे सेंटरतर्फे आयोजित शिबिराच्या पुरस्कार वितरण सोहोळ्यात दोरजे बोलत होत्या. जिल्हा परिषद अध्यक्ष कलावती वाकोडकर यांनी आपल्या भाषणातून व्यक्तिमत्त्व विकासासाठी कराटे उपयुक्त ठरत असल्याचे नमूद करीत प्रशिक्षण संस्थेने अधिकाधिक मुलांना या कलेत पारंगत करण्याची सूचना केली.
क्रीडा क्षेत्रात नैपुण्य प्रश्नप्त करणाऱ्या खेळाडूंना प्रश्नेत्साहन म्हणून विविध सेवांमध्ये आरक्षण देण्यात आले आहे.
त्या दृष्टीने खेळाडूंनी स्वत:ला सिद्ध करावे, असे आवाहन जिल्हा स्वयंरोजगार केंद्राचे मोहन घाटोळ यांनी केले.
जिल्हा क्रीडा अधिकारी विजय संतान, प्रहारचे प्रश्न. मोहन गुजरकर, कवी इमरान राही, हरीश तांदळे, प्रदीप दाते, मुरलीधर बेलखोडे यावेळी उपस्थित होते. विलास वाघ, किरण पट्टेवार व उल्हास वाघ यांनी संचालन केले.