Leading International Marathi News Daily

गुरूवार, २५ जून २००९

(सविस्तर वृत्त)

राजकारणापेक्षा विकासाला महत्त्व - नगराध्यक्ष शेळके
बुलढाणा, २४ जून / प्रतिनिधी

नगरपालिकेच्या नवनिर्वाचित अध्यक्ष अनिता शेळके यांनी अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर

 

पत्रकारांशी बोलताना राजकारणापेक्षा विकासाला महत्त्व देणार असून शहरातील मूलभूत सुविधांसह काही महत्त्वाकांक्षी योजना राबविणार असल्याचे सांगितले.
माजी नगराध्यक्ष मीना गायकवाड यांनी त्यांच्या कार्यकाळात अनेक महत्त्वपूर्ण कामे करण्याचा प्रयत्न केला. चिखली जवळील पेनटाकळीच्या धरणातून बुलढाण्याला पाणी उपलब्ध करून देण्याच्या महत्त्वाकांक्षी योजनेबद्दल गायकवाड यांचे शेळके यांनी अभिनंदन केले.
शेळके म्हणाल्या की, आगामी काळात शहरात आरोग्याच्या दृष्टीने साफसफाईसाठी स्वच्छता पथक नेमून शहर स्वच्छ ठेवणार आहे. बुलढाणा शहर एकेकाळी थंड हवेचे ठिकाण म्हणून ओळखले जायचे. मात्र, अलीकडे शहरात तापमानाने उच्चांक गाठला आहे. त्यामुळे शहरात मोठय़ा प्रमाणात वृक्षारोपण, संगोपन व संवर्धन करण्याचा प्रयत्न राहील. व्यायामशाळांना प्रश्नधान्य देण्यात येईल, असे त्या म्हणाल्या.