Leading International Marathi News Daily

गुरूवार, २५ जून २००९

(सविस्तर वृत्त)

रोगनिदान शिबिरात महिला व बालकांची तपासणी
वाशीम, २४ जून / वार्ताहर

महिलांनी स्वत:च्या आरोग्याकडे लक्ष दिल्यास कुटुंब, समाज, राष्ट्र आरोग्यसंपन्न होईल, असे

 

प्रतिपादन महिला काँग्रेसच्या जिल्हा उपाध्यक्ष डॉ. अलका मकासरे यांनी व्यक्त केले.
मंगरूळपीर तालुक्यातील ‘भडकुंभा’ येथे खासदार राहुल गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित स्त्रीरोग व बालरोग निदान शिबिरामध्ये डॉ. अलका मकासरे बोलत होत्या. घरातील एक स्त्री जर सुदृढ, आरोग्यसंपन्न असली तर ते कुटुंब सुखी व आनंदी असते.
भावी पिढी सुदृढ, सक्षम बनवण्याची जबाबदारीही स्त्रियांवरच असते. म्हणून कुटुंबातील स्त्रियांनी सर्वप्रथम स्वत:च्या आरोग्याची काळजी घ्यावी, असे आवाहन यावेळी डॉ. अका मकासरे यांनी केले. सृजनाची, नवनिर्माणाची अमूल्य देणगी ईश्वराने स्त्रियांना दिली आहे परंतु, समाजात आर्थिक व सामाजिक कारणांमुळे स्त्रिया आपल्या आरोग्याकडे लक्ष देत नसल्याचे यावेळी त्यांनी स्पष्ट केले.
या शिबिराप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष मेघा वाघमारे, संघटन सचिव कविता चव्हाण, मीनाक्षी मुळे, गावंडे, डॉ. लव्हाळे, डॉ. मंजुश्री जांभरूणकर, भडकुंभा येथील सरपंच छगन चव्हाण उपस्थित होते. यावेळी प्रश्नस्ताविक डॉ. लव्हाळे यांनी केले.
डॉ. मंजुश्री जांभरूणकर यांनी स्त्रियांना आरोग्यविषयक व आहारासंबंधी मार्गदर्शन केले. मेघा वाघमारे यांनी महिलांच्या आरोग्याविषयी मनोगत व्यक्त केले. या शिबिरात डॉ. अलका मकासरे व डॉ. मंजुश्री जांभरूणकर यांनी ४०० महिला व बालरुग्णांची तपासणी करून औषधाचे वाटप केले. या शिबिराच्या भडकुंभा, दाभडी, दाभा व परिसरातील गावांमधील महिला व बालरुग्णांना लाभ मिळाला. आभार मीनाक्षी मुळे यांनी मानले. या शिबिरासाठी जिल्हा महिला काँग्रेस, राहुल गांधी युथ ब्रिगेड, कविता चव्हाण, बेबी चव्हाण, पारू चव्हाण, इंदू जाधव, प्रमिला राठोड व भडकुंभा येथील ग्रामस्थांनी सहकार्य केले.