Leading International Marathi News Daily

गुरूवार, २५ जून २००९

(सविस्तर वृत्त)

महिला बचतगट कार्यशाळा
बुलढाणा, २४ जून / प्रतिनिधी
बचत गट सदस्यांनी एकसंघ राहून स्वविकासाबरोबरच राष्ट्राच्या उन्नतीसाठी हातभार लावावा, असे

 

आवाहन आमदार विजयराज शिंदे यांनी केले. सावता माळी समाज विकास शैक्षणिक व बहुउद्देशीय मंडळाच्या वतीने महिला बचत गट सदस्यांची कार्यशाळा येथे झाली.
प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी मंडळाचे अध्यक्ष जालिंधर बुधवंत होते. यावेळी जिल्हा परिषद सदस्य पुरुषोत्तम लखोटिया, विस्तार अधिकारी वाघ उपस्थित होते. प्रश्नरंभी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्वलन करण्यात आले.
यावेळी वाघ यांनी बचत गटाच्या नियम व अटी, नियमित सभा घेणे, वर्गणी जमा करणे, रेकॉर्ड ‘किपिंग’ तसेच बचत गटाने संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानात भाग घेणे, वैयक्तिक शौचालय बांधकाम, ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ याबाबत मार्गदर्शन केले. अध्यक्षीय भाषणात बुधवंत यांनी बचत गटांनी ‘रेकॉर्ड किपिंग’ कसे करावे व ‘रेकॉर्ड’चे महत्त्व विशद करून बँकेशी गटाचा समन्वय कसा असावा, तसेच शासकीय योजनेचा लाभ घेऊन गट संवर्धनातून व्यक्तिगत विकास साधावा, असे आवाहन केले. कार्यक्रमाचे संचालन सुषमा मुंगळे यांनी केले. कार्यशाळेला १० बचत गटाच्या ११० सदस्य उपस्थित होत्या. या कार्यशाळेसाठी संस्था प्रतिनिधी दीपक गराडे, समाजसेविका सुषमा मुंगळे, वंदना बोर्डे, सहायक प्रकल्प अधिकारी नरेंद्र नरवाडे, संदीप झाडोकार, दिलीप गोरे, आत्माराम जाधव, लक्ष्मण जाधव, शेख सलीम यांनी परिश्रम घेतले.