Leading International Marathi News Daily

गुरूवार, २५ जून २००९

(सविस्तर वृत्त)

पुसदला बाल रुग्णालयाचे उद्घाटन
पुसद, २४ जून/ वार्ताहर

येथील बालरोगतज्ज्ञ डॉ. तुषार पवार यांच्या क्रिष्णा बाल रुग्णालयाचे नुकतेच उद्घाटन झाले.

 

अध्यक्षस्थानी माजी आमदार विजय चोंढीकर होते. उद्घाटक अनिता नाईक होत्या.
प्रमुख पाहुणे म्हणून के.डी. जाधव, बी.जी. राठोड, श्रीराम पवार, आशा कदम, गुलाब नाईक उपस्थित होते. व्यासपीठावर डॉ. तुषार पवार, मंदा पवार सामाजिक कार्यकर्ते मसूद मिर्झा उपस्थित होते.
प्रश्नस्ताविक मसूद मिर्झा यांनी केले. अध्यक्षीय भाषणात विजय पाटील यांनी रुग्णांना सुसज्ज आणि वेळेवर रुग्णांवर सेवा मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली. उद्घाटकीय भाषणात अनिता नाईक, गोरगरिबांची सेवा करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली. याप्रसंगी राठोड यांनीही विचार मांडले.
संचालक डॉ. मधुकर नाईक यांनी केले तर आभार प्रकाश पवार यांनी मानले. या कार्यक्रमास डॉ. एन.एन. राठोड, शंकर पवार, नितीन पवार, राजेश डुब्बेवार, चिंतामण राठोड, अ‍ॅड. दिनेश राठोड, प्रवीण पवार, माणिक राठोड, रणवीर पाटील, संदीप राठोड उपस्थित होते.