Leading International Marathi News Daily

गुरूवार, २५ जून २००९

(सविस्तर वृत्त)

कारंजा लाड येथे राजू शेट्टी यांचा सत्कार
कारंजा-लाड, २४ जून / वार्ताहर

राजकारण वाईट नाही. राजकारणाचे शुद्धीकरण करायचे असेल तर जात, धर्म यांच्या प्रलोभनाला

 

बळी न पडता, सत्शील प्रवृत्तीच्या उमेदवारांना निवडून दिले पाहिजे, असे स्पष्ट प्रतिपादन खासदार राजू शेट्टी यांनी केले.
कारंजा प्रेस क्लबच्यावतीने खासदार राजू शेट्टी यांचे ‘राजकारणाचे बाजारीकरण व गुन्हेगारीचे स्वरूप’ या विषयावर मंगळवारी जाहीर व्याख्यान आयोजित करण्यात आले. अध्यक्षस्थानी स्वातंत्र्यसेनानी अण्णासाहेब बुरघाटे होते. याप्रसंगी जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष ज्योती गणेशपुरे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रवक्ते गजानन अमदाबादकर, युवा आघाडी अध्यक्ष रविकांत तुपकर, पत्रकार संघाचे सचिव गोपाल भोयर, जगदीश इनामदार, कारंजा प्रेस क्लबचे अध्यक्ष श्याम सवाई व्यासपीठावर उपस्थित होते.
विविध संघटनांच्या वतीने खासदार राजू शेट्टी यांचे स्वागत करण्यात आले. प्रेस क्लबच्या वतीने शाल-श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन खासदार शेट्टी यांचा सत्कार करण्यात आला.
संसदेत अनेक लक्ष्मीपुत्र निवडून आले. निवडणुकीसाठी कोटय़वधी रुपये खर्च करणारेही आहेत. आपल्याला मात्र जनतेने ‘नोट आणि व्होट’ दोन्ही दिलेत. निवडणूक खर्च भागवून आजही साडेचार लाख रुपये शिल्लक असल्याचे ते म्हणाले.
प्रेसक्लबचे उपाध्यक्ष हमीद शेख यांनी प्रश्नस्ताविक केले. अध्यक्ष श्याम सवाई यांनी खासदार शेट्टी यांच्या कार्याचा परिचय करून दिला. कार्यक्रमाचे संचालन अनिता थेर यांनी केले. ज्ञानेश्वर खंडारे यांनी शेतकरी गीत सादर केले. दिगंबर सोनोने यांनी आभार मानले.