Leading International Marathi News Daily

गुरूवार, २५ जून २००९

(सविस्तर वृत्त)

अकोल्यातील पाणीटंचाईवर आज मुंबईत चर्चा
अकोला, २४ जून/ प्रतिनिधी

अकोला शहरातील पाणीटंचाईवर उपाययोजना करण्यासाठी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, जलसंपदा

 

मंत्री अजित पवार यांच्याशी विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते भाऊसाहेब फुंडकर व अन्य नेते २५ जूनला चर्चा करणार आहेत.
जलसंपदा मंत्री अजित पवार यांनी अकोला शहरातील पाणीटंचाईवर उपाययोजना करण्यासाठी ५० लाख रुपये देण्याचे आश्वासन दिले आहे. विधान परिषदेत भाऊसाहेब फुंडकर, गोपीकिसन बाजोरिया, वसंतराव खोटरे, बी. टी. देशमुख यांनी तर विधानसभेत आमदार तुकाराम बिरकड, हरिदास भदे, गोवर्धन शर्मा, नारायण गव्हाणकर, गुलाबराव गावंडे यांनी हा प्रश्न उपस्थित केला होता. त्यानंतर या विषयावर स्वतंत्र चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, जलसंपदा मंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत २५ जूनला बैठक बोलविण्यात आली आहे. अप्पर वर्धा किंवा हतनूर या दोन धरणातून अकेाल्याला पाणी पुरवठय़ाचा पर्याय ठरू शक तो. या बैठकीला महापौर मदन भरगड, जिल्हाधिकारी एम शंकरनारायणन, महापालिका आयुक्त गिरीधर कुर्वे आदी उपस्थित राहणार आहेत. काटेपूर्णा प्रकल्प कोरडे पडल्यामुळे अकोला शहरात पाणीटंचाईचे संकट निर्माण झाले आहे.