Leading International Marathi News Daily

गुरूवार, २५ जून २००९

जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांना मुदतवाढ?
देवेंद्र गावंडे, चंद्रपूर, २४ जून

येत्या ऑक्टोबरमध्ये विधानसभेच्या निवडणुका असल्याने राज्यातील २६ जिल्हा परिषदांमधील अध्यक्षपदाची निवडणूक तीन अथवा सहा महिने पुढे ढकलण्याच्या प्रस्तावावर राज्यातील आघाडी सरकार गंभीरपणे विचार करीत असून जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांना मुदतवाढ मिळण्याचे संकेत आहेत. राज्यातील ३३ पैकी २६ जिल्हा परिषदांमधील अध्यक्ष व इतर पदाधिकाऱ्यांची मुदत येत्या २१ सप्टेंबरला संपणार आहे. मार्च २००७ ला निवडणुका होऊन हे पदाधिकारी सत्तेवर आले होते.

मेळघाटात पर्यटकांची निराशा
अमरावती, २४ जून / प्रतिनिधी

मेळघाटात पाऊस नसल्याने पर्यटनावर परिणाम झाला आहे. पहिल्या पावसानंतर मेळघाटात पावसाचा आनंद घेण्यासाठी पर्यटक धाव घेतात. मात्र यंदा पाऊस लांबल्याने पर्यटकांचाही निरस झाला आहे. धारणी आणि चिखलदरा या मेळघाटातील दोन तालुक्यांची जून ते सप्टेबर या चार महिन्यांच्या कालावधीतील पावसाची सरासरी अनुक्रमे ११७२ आणि १५२६ मिलीमीटर एवढी आहे. जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस याच तालुक्यांमध्ये पडतो. यंदा मात्र पावसाने हुलकावणी दिली आहे.

विकासाचा झंझावात
देवेंद्र गावंडे

दहा वर्षात चिमूरचा कायापालट घडवून आणणारे जलसंपदा राज्यमंत्री विजय वडेट्टीवार यांनी चिमूर विधानसभा मतदारसंघावरील पकड आणखी घट्ट केली आहे. कोटय़वधींची विकास कामे हे वडेट्टीवारांचे वैशिष्टय़ आहे. मतदारसंघातील लोकांच्या अडचणी ओळखून त्यांच्याकरिता मोफत चष्मे वाटप, शेतकऱ्यांकरिता विम्याची योजना, भूमिपुत्रांसाठी पुस्तके, अपंगासाठी सायकल तर विधवा व परित्यक्त्यांना शिलाई मशीनचे वाटप करून प्रत्येक वेळी आमदार विजय वडेट्टीवार यांनी मदतीचा हात समोर केला आहे. भाऊंची स्वारी मुंबईला असली तरी चिमूर विधानसभा मतदारसंघात कुणाचे घर जळाले, कुणावर वीज पडली, कुणी आत्महत्या केली अशी बातमी मिळाली तरी ते लागलीच परत येऊन त्या घरापर्यंत सढळ हाताने मदत करतात. त्यामुळे मतदारसंघातील विकास कामासोबतच दु:खीतांचे अश्रू पुसणारा लोकप्रतिनिधी अशी प्रतिमा विजय वडेट्टीवार यांची आहे.

पिकांची नासाडी करणाऱ्या वन्यप्रश्नण्यांचा
कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी

यवतमाळ, २४ जून / वार्ताहर

वन्य प्रश्नण्यांकडून पिकांची नासाडी होणाऱ्या शेतकऱ्यांना दिली जाणारी नुकसान भरपाई अल्प आहे. विदर्भात सर्वाधिक नुकसान यवतमाळ जिल्ह्य़ात होत असल्याची धक्कादायक माहिती आहे. वन्य प्रश्नण्यांचा कायम स्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
वन्यपशूंच्या होणाऱ्या त्रासाने शेतकऱ्यांच्या संकटात आणखीनच भर टाकली आहे. विशेषत: जंगलाला लागून असलेल्या शेतीत रोही, निलगाय, हरणे, रानडुक्कर इत्यादी वन्यपशू धुडगूस घालतात आणि शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे पीक उध्वस्त करतात. रानडुक्कर आणि रोही या प्रश्नण्यांपासून पिकांचे संरक्षण व्हावे म्हणून शेताला काटेरी कुंपण घालून त्यात वीज प्रवाह सोडण्याचे जीवघेणे प्रयोग झाले आहे.

विदर्भात शाळेच्या पहिल्या ठोक्यालाच होणार २ कोटी ८ लाख पुस्तकांचे मोफत वाटप
यवतमाळ, २४ जून / वार्ताहर
शाळा सुरू होण्याच्या पहिल्याच दिवशी २६ जूनला नागपूर आणि अमरावती विभागातील जवळपास २८ हजार शाळांमध्ये २ कोटी ७ लाख २३ हजार पुस्तकांचे मोफत वाटप विद्यार्थ्यांना होणार आहे.

‘विठ्ठल दर्शन’ एक्सप्रेसच्या चार फेऱ्या धावणार
रविवारी पहिली गाडी

खामगाव, २४ जून / वार्ताहर

खामगाव येथून यावर्षी पंढरपूरकरिता श्री विठ्ठल दर्शन एक्सप्रेसच्या चार फे ऱ्या धावणार आहेत. रेल्वे प्रशासनाच्या या निर्णयामुळे भाविकांची मोठी सोय झाली आहे. यावर्षी आषाढी एकादशी ३ जुलै रोजी येत आहे. खामगाव येथून गेल्या पाच वर्षापासून पंढरपूरकरिता थेट रेल्वेगाडी सोडण्यात येते.

माजी सैनिकांना आवाहन
चंद्रपूर, २४ जून/ प्रतिनिधी

नागपूर येथे येत्या २७ जून रोजी माजी सैनिकांचा मेळावा कस्तुरचंद पार्क येथे आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्याला अनिस अहमद, संचालक सैनिक कल्याण विभाग, कर्नल सुहास जतकर उपस्थित राहणार आहेत. चंद्रपूर जिल्ह्य़ातील सर्व माजी सैनिक, विधवांनी या मेळाव्याला उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी केले आहे.

अशोक सानंदा आज पदभार स्वीकारणार
खामगाव, २४ जून / वार्ताहर

नवनिर्वाचित नगराध्यक्ष अशोक सानंदा उद्या, २५ जून ला दुपारी १२.३० वाजता पदभार स्वीकारणार आहेत. नगराध्यक्ष सानंदा हे वॉर्ड क्र. २५ मधून निवडून आले. त्यांची जन्मतारीख पण २५ असून ते २५ तारखेलाच नगराध्यक्षपदाचा पदभार स्वीकारणार आहेत. पदभार स्वीकारल्यानंतर सानंदा यांचा सत्कार करण्यात येईल. याप्रसंगी अलका सानंदा, भारती राजपूत, नरेंद्र बोबडे, कमलसिंह गौतम उपस्थित राहणार आहेत. अध्यक्षस्थानी आमदार दिलीप सानंदा राहणार आहेत. प्रमुख पाहुणे म्हणून उमाळकर, पी.एल. सोरमारे, सईदाबानो इब्राहीमखाँ, सैय्यद गणी सैय्यद मोहंमद, वैभव डवरे, माधुरी बोबडे उपस्थित राहणार आहे. पालिकेच्या विविध खात्यातील अधिकारी यांची बैठक २५ जून ला होत आहे.

वर्धेत राष्ट्रवादी सदस्य नोंदणीस प्रश्नरंभ
वर्धा, २४ जून / प्रतिनिधी

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सदस्यता नोंदणीच्या कार्यक्रमास नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या पुतळ्याच्या साक्षीने प्रश्नरंभ करण्यात आला. पक्षाच्या ओबीसी सेलतर्फे हा नोंदणी कार्यक्रम सुरू करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शरद केपट हे होते. सदस्य नोंदणी कार्यक्रमात शेतमजूर, कामगार, आदिवासी, दुर्बल मागासवर्गीय अशा घटकांना प्रश्नमुख्याने सामावून घेण्याचे आवाहन सेलचे जिल्ह्य़ाध्यक्ष अविनाश सातव यांनी केले. सदस्य नोंदणीचा आरंभ समाजसेवक चंद्रशेखर देशमुख यांच्यापासून करण्यात आला. याच कार्यक्रमात गरजू विद्यार्थ्यांना शालेय पुस्तकांचे वाटप करण्यात आले. शहराध्यक्ष श्याम लंगडे यांनी सदस्य नोंदणीची माहिती दिली. कार्यक्रमास बाबासाहेब लंगडे, पराग खडसे, विवेक अतकर, राज बाभुळकर, निखील सपाटे, पवन लंगडे, संजय घुडे उपस्थित होते.

चोरीच्या आरोपावरून मुख्याध्यापकास अटक
चंद्रपूर, २४ जून/प्रतिनिधी

दोन लाखाच्या चोरी प्रकरणात आश्रमशाळेचे मुख्याध्यापक व संचालक मंगेश चटप, शंकर सिडाम यांना गडचांदूर पोलिसांनी अटक केली आहे. गडचांदूर येथील नंदलाल चटप यांची संस्था आहे.
या संस्थेच्या माध्यमातून राजुरा, गडचांदूर, कोरपना या भागात आश्रमशाळा व शाळा संचालित करण्यात येतात. दोन दिवसांपूर्वी नंदलाल चटप यांच्याघरी दोन लाखाची चोरी झाली.
या चोरी प्रकरणी आज पोलिसांनी कोरपना येथील आश्रमशाळेचे मुख्याध्यापक मंगेश चटप व त्याचा सहकारी शंकर सिडाम याला अटक केली आहे.

पाण्यासाठी ३ किलोमीटर पायपीट
भंडारा, २४ जून / वार्ताहर

पवनी तालुक्यात मिन्सी गटग्रामपंचायतीतील पन्नासी गावातील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी तब्बल ३ किलोमीटरची पायपीट करावी लागत आहे. या गावाला मिन्सी ग्रामपंचायतीच्या जलवाहिनीद्वारे पाणी मिळायचे पण, मागील १ वर्षापासून मिन्सी गावालाच पाणी पुरत नाही. या कारणाने पन्नासीचा पाणीपुरवठा तोडला गेला. गावात एकही विहीर किंवा बोरवेल नाही. यामुळे सुमारे ३ किलोमीटर अंतरावर असलेल्या शेतामधील विहिरीतून बैलबंडीवरून पाणी आणावे लागते. या त्रासाबद्दल मिन्सी ग्रामपंचायत तहसील कार्यालय व संबंधितांना अर्ज विनंत्या केल्या गेल्या. परंतु, याकडे कोणीही लक्ष पुरविले नाही. उन्हाळ्यात या गावाला पाणी तरी मिळते आहे. परंतु, पाऊस पडल्यावर बैलगाडी विहिरीपर्यंत चिखलामुळे पोहोचणार नाही आणि गावापासून मोठा प्रश्न निर्माण होईल.

ब्रह्मपुरीत त्र्यंबक परशुरामकरचा गौरव
ब्रह्मपुरी, २४ जून / वार्ताहर

डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयाच्या पदव्युत्तर इतिहास विभागाचा विद्यार्थी त्र्यंबक परशुरामकर हा २००८च्या वार्षिक परीक्षेत विद्यापीठातून प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाल्याबद्दल त्याचा येथे सत्कार करण्यात आला. याच महाविद्यालयाचा विद्यार्थी नितेश डोर्लीकर हा तिसरा तर विनोद उंदिरवाडे हा सातव्या क्रमांकाने गुणवत्ता यादीत झळकला आहे. पदव्युत्तर समाजशास्त्र विभागातून शीतल मेश्राम ही विद्यार्थिनी विद्यापीठात गुणवत्ता यादीच झळकली आहे. महाविद्यालयातील प्रश्नध्यापक व प्रश्नचार्याचे नियोजनयुक्त मार्गदर्शन, नियमित होणारे वर्ग आणि सराव परीक्षा या गोष्टींवर भर दिल्याने दरवर्षीप्रमाणे यंदा देखील आमच्या महाविद्यालयाचा निकाल समाधान देणारा आहे. नव्हे, गुणवत्तेची परंपरा राखणारा आहे, असे मत प्रश्नचार्य डॉ. रामटेके यांनी व्यक्त केले. संस्था सचिव मारोतराव कांबळे व सर्व प्रश्नध्यापक वंृदांनी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

कुर्झा, इटगाव परिसरात रानडुकरांचा हैदोस
भंडारा, २४ जून / वार्ताहर

खापरी-कोरंभी जंगलात असणाऱ्या रानडुकरांनी वैनगंगा नदी ओलांडून कुर्झा, इटगाव, गोसे, वासेळा, लोणारा, बाम्हणी या गावाजवळील शेतात धुमाकूळ मांडला असून रब्बी पिकांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान केले आहे. सध्या शेतकरी खरीप पिकाच्या लागवडीकरिता शेतजमिनीची मशागत करीत आहेत. अशावेळी रानडुकरांचा कळप बैलांवर हल्ला चढवितात आणि वखरासह बैलजोडी सैरावैरा पळू लागते. अशा आकस्मिक हल्ल्यामुळे शेतकरी वर्गात दहशत निर्माण झाली आहे. कुर्झा येथील कावळे, इटगाव येथील रामकृष्ण कुझ्रेकर या शेतकऱ्यांच्या बैलांना जबर दुखापत झाली आहे. रानडुकरांच्या वाढत्या संख्येमुळेही शेतकरी त्रस्त झाला आहे. मागे एकदा रानडुकरांनी कुर्झा गावात हैदोस घालत ५-६ घरांची नासाडी केली होती आणि ग्रामस्थांना काहीच करता आले नव्हते. वनविभागाने या समस्यकडे लक्ष द्यावे, अशी ग्रामस्थांची मागणी आहे.

सेवानिवृत्त कर्मचारी संघटनेची सभा
चंद्रपूर, २४ जून/ प्रतिनिधी

वनविकास महामंडळ सेवानिवृत्त कर्मचारी संघटनेची सभा २८ जून रोजी दुपारी १२ वाजता संघटनेच्या कार्यालयात आयोजित करण्यात आली आहे. सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या ज्वलंत प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी ही सभा होणार आहे. मूळचे वन विकास मंडळाचे कर्मचाऱ्यांना पेंशन लागू करण्याबाबत, मूळचे वन विकास महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना पाचव्या वेतनाचे अेरिअर्स मिळण्याबाबत, लोहारा जंगल अदानी ग्रुपला देण्यापासून वाचवण्याबाबत तरी सभेला वनविकास महामंडळातील सर्व निवृत्त व कार्यरत कर्मचाऱ्यांनी बहुसंख्येने हजर राहावे, असे वनविकास महामंडळ सेवानिवृत्त कर्मचारी संघटनेचे पु.वि. डहाके यांनी कळवले आहे.

केरोसिन परवाना निलंबित
घाटंजी, २४ जून/ वार्ताहर

घाटंजी तालुक्यातील चिखलवर्धा येथील केरोसिन परवानाधारक अशोक घोडाम यांचा केरोसिन परवाना निवासी नायब तहसीलदार डब्ल्यू.पी. वैद्य यांनी निलंबित केला आहे.

सातनाला झुडुपात अर्भक आढळले
चिमूर , २४ जून / वार्ताहर

येथील सातनाला परिसरात नवजात शिशुचे अर्भक काटेरी झुडुपात फेकलेल्या अवस्थेत आढळले. या घटनेची माहिती मिळताच परिसरात एकच खळबळ उडाली. सातनाला परिसरात नवजात शिशुचे अर्भक आढळून आल्याने नागरिकांची गर्दी जमली होती. याप्रकरणाची चिमूर पोलिस ठाण्यात नोंद केली आहे.

घरफोडय़ास अटक
अकोला, २४ जून / प्रतिनिधी

चार तोळे चोरीचे सोने विकण्याचा प्रयत्न करणाऱ्या अब्दुल रफिक अब्दुल रऊफ या घरफोडय़ास जुने शहर पोलिसांनी सोमवारी संध्याकाळी अटक केली.

अमली पदार्थ विरोधी दिन
चंद्रपूर, २४ जून/ प्रतिनिधी

नशाबंदी मंडळ, सवरेदय मंडळ व भारतीय मैत्री दलाच्या वतीने अमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त २६ जून रोजी सकाळी ९ वाजता ब्रह्मपुरी येथे माहितीपर कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. अमली पदार्थामुळे होणारे व्यक्तिगत, कौटुंबिक, सामाजिक, आर्थिक, आरोग्य आणि पर्यावरण पातळीवरील नुकसान देशाच्या विकासासाठी हानीकारक आहे. अमली पदार्थामुळे प्रश्नैढ वयोगटात मरणाऱ्या व्यक्तींना त्यांच्या कुमारावस्थेत व युवा अवस्थेत अमली पदार्थ सेवनाची सवय लागते. अशा लक्ष गटांना जागृत करून त्यांना अमली पदार्थ सेवनापासून दूर ठेवण्याकरिता मंडळातर्फे विविध उपक्रम राबवण्यात येणार आहेत. यात सहभागी होऊ इच्छिणाऱ्यांनी नशाबंदी मंडळ ब्रह्मपुरी येथे संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

कारागृहातील हवालदाराजवळ सापडल्या गांजाच्या पुडय़ा
अकोला, २४ जून / प्रतिनिधी
मध्यवर्ती कारागृहातील एका हवालदाराजवळ गांजाच्या दोन पुडय़ा सापडल्यामुळे खळबळ उडाली. मंगळवारी संध्याकाळी तपासणीमध्ये हा प्रकार उघडकीस आला असून हवालदाराविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अकोला मध्यवर्ती कारागृहात दररोज संध्याकाळी पोलिसांची तपासणी केली जाते. मंगळवारी संध्याकाळी तपासणी सुरू असताना विठ्ठल गिऱ्हे (४५) या हवालदाराच्या बुटात गांजाच्या दोन पुडय़ा सापडल्या. या प्रकाराची माहिती कारागृह अधीक्षक गुलाबराव माटे यांना देण्यात आली. त्यांनी हवालदार विठ्ठल गिऱ्हेला सिटी कोतवाली पोलिसांच्या ताब्यात दिले. त्याच्याविरुध्द अंमली पदार्थ तस्करीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हवालदार विठ्ठल गिऱ्हे चार महिन्यापूर्वी मुंबईतून अकोल्यात बदलून आला आहे. मुंबईत असतानाही त्याच्याविरुध्द गांजा तस्करीची कारवाई झाल्याची माहिती आहे. याप्रकरणी त्याला बडतर्फही करण्यात आले होते. नंतर न्यायालयाच्या आदेशानुसार त्याला कामावर घेण्यात आले. उपनिरीक्षक देवानंद बागडे यांनी याप्रकरणी तपास सुरू केला आहे.

खामगाव अर्बन बँकेच्या संचालकपदी दिलीप देशमुख
खामगाव, २४ जून / वार्ताहर

विदर्भ, मराठवाडा, खान्देश, मध्यप्रदेश शाखा विस्तार असलेल्या खामगाव अर्बन बँकेच्या प्रबंध संचालकपदी दिलीप देशमुख तर सरव्यवस्थापकपदी अरविंद अंधारे व उपसरव्यवस्थापकपदी रूपेश परतकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यावेळी आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बँकेचे अध्यक्ष कन्हैय्यालाल पारीक हे होते. तज्ज्ञ सल्लागार वसंतराव देवधर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.