Leading International Marathi News Daily
गुरुवार २५ जून २००९
  हा माझामार्ग एकला ( ?)
  थर्ड आय
.. त्यांना हीच भाषा कळते का?
  क्रेझी कॉर्नर
या ‘लाजिरवाण्या’ घरात..
  मेल बॉक्स
  अवती भवती
पापा कहते है बडा नाम करेगी..
  ग्रूमिंग कॉर्नर
सामथ्र्य आहे सुट्टीचे..
  लँग्वेज कॉर्नर
इतिहास म्हणजे काय?
  स्मार्ट बाय
  यंग अचिव्हर्स
रफ अ‍ॅण्ड टफ
  नेट कॉर्नर
  इव्हेंटस
  ओपन फोरम
  ब्यूटी कॉर्नर

घरोघरी - हुशारी
विजय : काय गं या वर्षी आपल्या ओळखीतलं दहावीला कोण कोण आहे?
वैशाली : बरीच जणं आहेत. रानडय़ांचा प्रणव, करंदीकरांची प्राची, आणखी कोण आहे गं वेदा?
वेदा : असं काय करतेस? या वर्षी आपल्या एरियातलं मॅक्सिमम पब्लिक दहावीला आहे. दिशा, मनाली, प्राजू, महालक्ष्मी, संवेदना, अवंती..
विजय : सगळ्या मुलीच आहेत की-

 

वेदा : हो आणि मुलगीच पहिली येणार!
विराज : रिझल्ट कोणी तुझ्या कानात का स्वप्नात येऊन सांगितला का?
वेदा : जरा मागं वळून पाहिलंस ना तर तुलाही कळेल.
विराज : मागं काय आहे?
वेदा : ए थप्पड, मागं वळून बघ म्हणजे शब्दश: नाही रे. तू तरी ग्रेटच आहेस हं विराज.. अरे, गेल्या काही दिवसांतल्या बातम्या बघ. बायकांची नुसती घोडदौड चालू आहे. कृष्णा पाटील एव्हरेस्टवर झेंडा फडकवून आली. मीरा कुमार सभापती झाल्या. बारावी, सीईटी, एमपीएससी.. अरे जिकडे बघावं तिकडे मुलीच बाजी मारताहेत रे. त्यामुळे ही परंपरा आता दहावीच्या परीक्षेतही कायम राहणार, यात शंकाच नाही.
विराज : असू दे. असू दे. इतकी वर्षं आम्ही मुलांनी मैदान मारलं होतं, म्हणून आता थोडी तुम्हा मुलींना संधी देतोय. कळलं ना. उगीच जास्त डिंग मारू नका.
वेदा : तोंड बघा आम्हाला संधी देणाऱ्यांचं. इथं साधं मागं वळून बघ याचा अर्थ कळत नाही आणि म्हणे तुम्ही आम्हाला संधी दिली.
विराज : एखाद्या गोष्टीचा अर्थ कळला नाही म्हणून एवढं काही हिणवायला नकोय.
वेदा : का रे? आता का नाकाला मिरच्या झोंबल्या? तर बाळा, सांगायचा उद्देश म्हणजे मुलींना मिळणारं यश हे कोणी त्यांना दान म्हणून दिलेलं नाहीय तर ते त्यांच्या मेहनतीचं, प्रामाणिकपणाचं, ध्यासाचं फळ आहे. कळलं ना!
विजय : हे अगदी खरंय हं वेदा. मुली खरंच खूप सिन्सियर असतात. मेहनती असतात.
वेदा : पण बाबा. त्याचबरोबर त्यांना हे जगाला दाखवून द्यायचं असतं की, हम भी कुछ कम नही. त्यामुळे त्या सगळी शक्ती एकवटून प्रयत्न करतात आणि यश मिळवतात.
विजय : पूर्वी मुलांची आपापसात स्पर्धा होती..
वेदा : विसरा आता ते दिवस. आता मुली आता टफ फाईट देण्याचं ठरवूनच येतात.
विराज : असू दे. तू कितीही ढोल पिटलास तरी कठीण समजल्या जाणाऱ्या विषयात अजून तरी मुलंच पुढे आहेत. तिथं तुम्हा मुलींचं काही चालत नाही.
वेदा : असंच काही नाही हं. आजपर्यंत असा समज प्रचलित होता की, मुलींना मॅथ्ससारखे किंवा टेक्निकल विषय जमत नाहीत. पण आता परिस्थिती बदलते आहे. मुलांसाठीच्या राखीव कुरणांमध्येही मुलींनी प्रवेश मिळवला आहे. नुसता प्रवेश नाही, स्वत:ला प्रूव्ह करून दाखवलं आहे.
विराज : अरे शिक्षण घेतलं म्हणजे झालं, असं होतं का? त्या शिक्षणाचा पुढे उपयोग करतात का? त्यांच्या सगळ्या फुशारक्या लग्न होईपर्यंत. लग्न झालं की संपलं. शेवटी चूल आणि मूल हेच तुमचं कार्यक्षेत्र ना?
वेदा : ए चूल मूलवाल्या, तू म्हणजे टीपिकल एमसीपी आहेस.
विराज : तू काहीही म्हण. पण मी म्हणतोय ते खोटं आहे का?
वेदा : मला वाटतं विराज, हा मुद्दा आहे तो ग्लास अर्धा भरलेला आहे का अर्धा रिकामा आहे या प्रकारचा आहे.
विराज : वेदा, कोडय़ात बोलू नकोस. जे काय सांगायचं आहे ते स्पष्ट सांग. मला हे असं घूमा फिराके बोललेलं बिलकुल आवडत नाही.
वेदा : आवडत नाही का कळत नाही?
विराज : कळत नाही म्हण. अरे, पण जे सरळ बोलता येतं ते कशाला अशा आडवळणांनी, उपमा- उत्प्रेक्षांची जोड देत बोलायचं? मग होतं काय ना की मूळ मुद्दा बाजूलाच राहतो. मला असं वाटतं की, जेव्हा आपल्याकडे ठोस मुद्दे नसतात ना तेव्हाच हे असं बोललं जातं. कारण मॅनेजमेंट गुरू म्हणतातच, कऋ ८४ ूंल्ल'३ ूल्ल५्रल्लूी, ूल्लऋ४२ी ३ँीे.
वेदा : पुरे. किती बोलशील! मला नावं ठेवता ठेवता तूही तेच करतो आहेस बघ. आपण कशाबद्दल बोलत होतो हेच मी विसरून गेले बघ.
विजय : ते ग्लास भरलेला का रिकामा..
वेदा : हां हां. तर मी काय म्हणते विराज, तुला फक्त त्याच मुली दिसतात ज्यांनी आपल्या शिक्षणाचा उपयोग केला नाहीये. याउलट मला त्या मुली दिसतात ज्या पुरुषांची मक्तेदारी असलेल्या अनेक क्षेत्रांत पाय घट्ट रोवून उभ्या आहेत.
विराज : चला, म्हणजे मुली त्यांच्या शिक्षणाचा उपयोग करत नाहीत, हे तरी तुला मान्य आहे.
वेदा : यासाठी तू फक्त त्या मुलींनाच कसं दोषी धरतोस? अरे, त्यामागची कारणं कधी समजावून घ्यायचा प्रयत्न केला आहेस का? तुला खरं सांगू, ज्या वेगानं बाईंची वैचारिक प्रगती होत गेली तो वेग समाजाला नाही पकडता आला. त्यामुळे मुलींवर आजही अनेक बंधनं घातली जातात. सगळ्यांना या बेडय़ा तोडता येतातच असं नाही. पण म्हणून सगळा दोष त्यांनाच द्यायचा का? अरे, ज्या मुलीनं इतकी जीवतोड मेहनत करून शिक्षण घेतलेलं असतं ते काय चुलीत घालायला? कित्येक वेळेला प्राप्त परिस्थितीला शरण जाण्याखेरीज पर्याय नसतो एखादीपुढं. अरे, एखादीचं पाय मागे घेणं समजावून घ्या, तसेच ज्या पुढे जाताहेत त्यांचं कौतुक करा.
विराज : हो गं वेदा, या दृष्टीनं मी कधी विचारच केला नव्हता.
वेदा : आता पटलं ना? मी तुला हे सांगितलं तेव्हा तुला कळलं ना? म्हणूनच म्हणते, मुलीच हुशार असतात..
शुभदा पटवर्धन
shubhadey@gmail.com