Leading International Marathi News Daily

शुक्रवार, २६ जून २००९

‘सरस्वती’ प्रसन्न
प्रतिनिधी

माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परीक्षेत मुंबई विभागात बाजी मारण्याची परंपरा ठाणेकरांनी यंदाही कायम राखली आहे. एक- दोन नव्हे, तब्बल तीन मुलींनी मुंबई विभाग आणि जिल्ह्यातही पहिले तीन क्रमांक पटकावले. बोर्डाचा निकाल ११ वाजता जाहीर होणार असल्याने आणि गुणवत्ता यादीत चमकणाऱ्या मुलांना पूर्वकल्पना देण्याची पद्धत यावर्षीपासून मोडीत निघाल्याने सगळ्यांच्या नजरा इंटरनेटकडे लागल्या होत्या.

‘यशस्वी भव’मुळे मिळाले यश
प्रतिनिधी
‘लोकसत्ता’च्या ‘यशस्वी भव’ या उपक्रमाचा अभ्यासात चांगला फायदा झाला. सकाळी पेपर वाचताना ‘यशस्वी भव’मधील तज्ज्ञांचे मार्गदर्शन, सूचना वाचायला मिळायच्या. त्याचा अभ्यासात फायदा झाला. त्यामुळे आपल्या यशाचा ‘लोकसत्ता’ही भागीदार असल्याचे धनश्री गणपत नाईक हिने सांगितले. नौपाडय़ातील सरस्वती सेकंडरी शाळेची विद्यार्थिनी धनश्री ९४.७६ टक्के गुणांनी उत्तीर्ण झाली असून तिने आपल्या यशाचे श्रेय आई-वडील, शाळेतील शिक्षक आणि ‘लोकसत्ता’च्या ‘यशस्वी भव’ला दिले आहे. दररोज बॅडमिंटन, हॉलीबॉल खेळणे आणि अभ्यास असा धनश्रीचा दिनक्रम होता. दहावी असूनही तिने बॅडिमटनमध्ये राज्यस्तरावर तर हॉलीबॉलमध्ये जिल्हास्तरावर यश मिळविले. कित्येक वर्षांंपासून आम्ही ‘लोकसत्ता’चे वाचक आहोत. दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शनपर असलेल्या यशस्वी भव उपक्रमातील तज्ज्ञांचे मार्गदर्शन व सूचना काळजीपूर्वक वाचत होते. अभ्यासाला पूरक असे हे मार्गदर्शन परीक्षेत खूप फायदेशीर ठरले, असेही धनश्रीने सांगितले.

नवनीत नेहरोल अपंगांमध्ये पहिला
प्रतिनिधी

व्ही. एन. सुळे हायस्कूलमधील दोन विद्यार्थी गुणवत्तायादीत आले आहेत. त्यापैकी मुंबई विभागातून नवनीत नेहरोल हा विद्यार्थी ९४.६९ टक्के मिळवून अपंगांमध्ये पहिला आला आहे. त्याचप्रमाणे ९६.१५ टक्के गुण मिळवून मृण्मयी जाधव मुंबई विभागातून मुलींमध्ये तिसरी आली आहे. नेहरोलने आतापासून आयआयटीच्या प्रवेशपरीक्षेचा अभ्यास सुरू केला आहे. त्याला आयआयटीमधून सिव्हिल इंजिनीअरिंग करायचे आहे.

अ‍ॅड‘मिशन’
अकरावी प्रवेशासाठी चढाओढ

प्रतिनिधी

अभियांत्रिकी, आरोग्य विज्ञान, औषधनिर्माणशास्त्र इत्यादी अभ्यासक्रमांचे प्रवेशद्वार म्हणून कनिष्ठ महाविद्यालयातील विज्ञान शाखेकडे पाहिले जाते. त्यामुळे अकरावीमध्ये विज्ञान शाखेमध्ये प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थी इच्छुक असतात. त्या खालोखाल वाणिज्य शाखेकडे प्रवेश घेण्याचा विद्यार्थ्यांचा कल असतो. परंतु, मुंबई विभागामध्ये विज्ञान शाखेच्या जागांची कमतरता असल्याने विद्यार्थ्यांना नाइलाजाने वाणिज्य किंवा कला शाखेची वाट धरावी लागेल.

पंचनामा श्वेतपत्रिकेचा
एफएसआय खिरापतीचा पाणीपुरवठय़ाला फटका

संदीप आचार्य

मुंबईत परप्रांतातून येणारे लोंढे, त्यातून निर्माण होणाऱ्या अनधिकृत झोपडय़ांमुळे पाणीपुरवठय़ाचे गणित जसे बिघडत चालले आहे, त्याचप्रमाणे एसआरएपासून विविध योजनांसाठी राज्य शासनाकडून वाटण्यात येणाऱ्या एफएसआय (चटईक्षेत्र)च्या खिरापतीचाही मोठा फटका येणाऱ्या काळात मुंबईच्या पाणीपुरवठय़ाला बसणार आहे.

कोकण व्हिजन २०२० परिषद
प्रतिनिधी

कोकणाच्या विकासाचे धोरण ठरविताना सर्वसामान्य कोकणवासीयांचे म्हणणे काय आहे ते समजून घेतले पाहिजे. विविध विषयांत यशस्वीपणे काम करणाऱ्या तज्ज्ञांच्या मदतीने राज्याचे माजी मुख्य सचिव द. म. सुकथनकर यांच्या मार्गदर्शनाखाली ‘कोकण विकासा’चा विकास आराखडा बनविण्यात आला आहे.