Leading International Marathi News Daily

शुक्रवार, २६ जून २००९

(सविस्तर वृत्त)

संत्री, मोसंबी उत्पादक शेतक री अडचणीत; आंदोलनाचा शिवसेनेचा इशारा
नागपूर, २५ जून / प्रतिनिधी

विदर्भातील संत्री, मोसंबी उत्पादक शेतकरी अपुरा पाऊस आणि डिंक्या रोगाच्या प्रादुर्भावाने

 

अडचणीत आले असून त्यांना मदतीचा हात न दिल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा माजी खासदार प्रकाश जाधव यांनी दिला आहे.
विदर्भात सुमारे दीड लाख हेक्टर क्षेत्रात संत्री व मोसंबीचे सहा लाख मेट्रिक टनापेक्षा जास्त उत्पादन होते. मात्र, अपूरा पाऊस आणि डिंक्या रोगामुळे हे पीक धोक्यात आले आहे. यामुळे शेतकऱ्यांचे कोटय़वधी रुपयांच्या पिकाचे नुकसान झाले आहे. एकीकडे नापिकीमुळे सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या तर दुसरीकडे संत्री उत्पादक शेतकरी आर्थिक अडचणीत आले आहेत, याकडे जाधव यांनी लक्ष वेधले.
पश्चिम महाराष्ट्रात नैसर्गिक आपत्ती आल्यास बागायतदार शेतकऱ्यांना भरघोस मदत करण्यात येते. त्यांच्या तुलनेत वैदर्भीय शेतकऱ्यांचे नुकसान अत्यल्प आहे. विदर्भात पंतप्रधान पॅकेजची अंमलबजावणी सुरू असली तरी शेतकऱ्यांना आवश्यक अनुदान मिळालेले नाही. नागपूर जिल्ह्य़ातील सर्वाधिक शेतकरी असून त्यांचे नुकसान मोठे आहे. याबाबत मुख्यमंत्र्यांसह संबंधित मंत्री आणि अधिकाऱ्यांना वारंवार निवेदन देण्यात आले. परंतु, अद्याप त्याची दखल घेण्यात आलेली नाही. यामुळे शेतकऱ्यांना तात्काळ मदत मिळाल्यास यापुढे तीव्र आंदोलन करण्यात येईल, असे प्रकाश जाधव यांनी म्हटले आहे.