Leading International Marathi News Daily

शुक्रवार, २६ जून २००९

(सविस्तर वृत्त)

हिंदू सबसेक्शन अ‍ॅक्टवर चर्चासत्र
नागपूर, २५ जून / प्रतिनिधी

‘हिंदू सबसेक्शन अ‍ॅक्ट’ने आता कायद्याचे स्वरुप घेतले असून २००५ मध्ये हा कायदा पारित

 

करण्यात आला आहे. यानुसार मुलगी आणि मुलाला समान अधिकार देण्यात आले आहेत. इन्स्टिटय़ूट ऑफ चार्टर्ड अकाऊन्टटस ऑफ इंडियाच्या नागपूर शाखेतर्फे हिंदूू सबसेक्शन अ‍ॅक्टवर चर्चा करण्यासाठी नुकतेच एक चर्चासत्र आयोजित करण्यात आले. याप्रसंगी चार्टर्ड अकाऊन्टट कैलाश जोगानी प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते. यावेळी जोगानी यांनी एचयुएफ आणि त्यात असलेल्या विविध तरतूदींची माहिती दिली. या कायद्यानुसार वडिलांच्या संपत्तीत मुली व मुलाला समान अधिकार देण्यात येतात. यात कोण्या वारसदाराचा मृत्यू झाला, तर इतर वारसदारांमध्ये संपत्तीचे समान वाटप करण्यात येते. हिंदूू सबसेक्शन अ‍ॅक्टमध्ये एखाद्या व्यक्तीने मृत्यूपूर्व मृत्यूपत्र तयार केले असेल, तर त्याला ग्राह्य़ धरण्यात येते. यावेळी मिलींद पटेल यांनी इन्स्टिटय़ूटच्या इतर उपक्रमांची माहिती दिली. यावेळी माजी अध्यक्ष जुल्फेश शहा, सतीश सारडा, अभिजीत केळकर, स्वप्निल अग्रवाल, दिपक हेडा, नरेश जखोटिया, बी.ए. नासेरी, अनिल केडिया, चारुदत्त मराठे, जेठालाल रुखिया आदी उपस्थित होते.