Leading International Marathi News Daily

शुक्रवार, २६ जून २००९

(सविस्तर वृत्त)

बालरोग तज्ज्ञांची ४ व ५ जुलैला राष्ट्रीय परिषद
नागपूर, २५ जून / प्रतिनिधी

बालरोग तज्ज्ञ संघटनेच्या नागपूर शाखेतर्फे किशोरवयीन मुलांच्या समस्यांवर चर्चा करण्यासाठी ४

 

ते ५ जुलैला धरमपेठेतील ‘वनामती’ येथे बालरोग तज्ज्ञांची ‘मिड-अ‍ॅडोलेस्कॉन २००९’ ही राष्ट्रीय परिषद आयोजित करण्यात आली आहे.
२००८ मध्ये किशोरवयीन मुलांच्या विविध समस्या हाताळण्यासाठी नागपुरातील बालरोग तज्ज्ञांनी ‘अ‍ॅडोलसेंट चॅप्टर’ नावाने एक संस्था स्थापन केली आहे. ही संस्था आणि बालरोग तज्ज्ञ संघटनेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेत विविध विषयांवर सात कार्यशाळा आयोजित करण्यात आल्या आहेत. त्यात ‘९ ते १९ वयोगटातील किशोरवयीन मुलांचा आहार व वाढ’, ‘शारीरिक व मानसिक आरोग्य’,‘जीवन कौशल्ये’, ‘लैंगिक समस्या’, ‘प्रसार माध्यमांमुळे उद्भ्भवणाऱ्या समस्या’, ‘रोगप्रतिबंधक लसीकरण’ ‘आत्महत्येची समस्या’ ‘करिअरची भीती’, ‘पालकांचे दडपण’ ‘घराबाहेरील समस्या’ या प्रमुख विषयावर देशातील बालरोग तज्ज्ञ योग्य सल्ला देणार असल्याची माहिती ज्येष्ठ बालरोग व बाल मानसोपचार तज्ज्ञ तसेच संयोजन समितीचे अध्यक्ष डॉ. श्रीकांत चोरघडे यांनी पत्रकार परिषदेत दिली. या परिषदेत भाग घेणाऱ्या देशातील इतर बालरोग तज्ज्ञांमध्ये डॉ. एन.के.सी. नायर, डॉ. सी.पी. बंसल, डॉ. जे.एस. तुलेजा, डॉ. सुकांता चॅटर्जी, डॉ. यमुना, डॉ. एम. देशपांडे, डॉ. तुषार राणे, डॉ. समीर दलवई, डॉ. खीरवडकर, डॉ. प्रिती गलगली, डॉ. पी. बाफना, डॉ.प्रकाश देव यांचा समावेश आहे. तसेच नागपुरातील डॉ. श्रीकांत चोरघडे, डॉ. उदय बोधनकर, डॉ. राजीव मोहता, डॉ. निशिकांत कोतवाल, डॉ. आर.जी. पाटील, डॉ. सुधीर भावे, डॉ.जया शिवलकर, डॉ. सुधीर पानगावकर, डॉ. संजय देशपांडे हे तज्ज्ञ परिषदेला उपस्थित राहतील. या परिषदेत देशातील दीडशे तज्ज्ञ सहभागी होण्याची शक्यता आहे. या परिषदेचा लाभ बालरोग तज्ज्ञ, पालक, शिक्षकांनी घेण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. पत्रकार परिषदेला डॉ. राजीव मोहता, डॉ. निशिकांत कोतवाल, डॉ. आर.जी. पाटील, डॉ. भारद्वाज उपस्थित होते.