Leading International Marathi News Daily

शुक्रवार, २६ जून २००९

(सविस्तर वृत्त)

राहुल गांधींच्या वाढदिवशी मिठाईचे वाटप
नागपूर, २५ जून/ प्रतिनिधी

नॅशनल स्टुडंटस् युनियन ऑफ इंडियातर्फे (एनएसयुआय) राहुल गांधी यांचा ३९ वा जन्मदिवस

 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्गावरील कमाल चौक येथे साजरा करण्यात आला. यावेळी गृहराज्यमंत्री नितीन राऊत, राष्ट्रीय संघटक कृष्णा पांडे, नगर समितीचे सरचिटणीस रत्नाकर जयपूरकर, राजा द्रोणकर, विनोद सोनकर, हरिभाऊ किरपाने, फिलीप जयस्वाल एनएसयुआयचे सचिव अजित सिंग व युवक काँग्रेसचे सरचिटणीस धीरज पांडे उपस्थित होते. राहुल गांधींच्या वाढदिवसानिमित्त केक व मिठाईचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमात अजय वंजारी, पंकज नगरारे, पवित्र वासनिक, राहुल चोरपगार, अनुप शहा आणि पारुल लाडे आदी उपस्थित होते. संचालन सुनील तिवारी यांनी केले तर, लखन यादव यांनी आभार मानले.
कलार समाजाने कोळसा मंत्री श्रीप्रकाश जयस्वाल यांचे स्वागत केले.
केंद्रीय मंत्री जयस्वाल यांचे कलार समाजातर्फे स्वागत
केंद्रीय मंत्री श्रीप्रकाश जयस्वाल यांचे कलास समाजाच्यावतीने स्वागत करण्यात आले. निको ग्रुपचे प्रमुख बसतलाल साव यांच्या सिव्हिल लाईनमधील निवासस्थानी हा कार्यक्रम पार पडला. कलार समाजाचे कार्यकर्ते मोठय़ा संख्येने यावेळी उपस्थित होते. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसतर्फे योग्य उमेदवार देण्यासंदर्भात प्रयत्न करण्याची मागणी त्यांनी जयस्वाल यांच्याकडे केली. कलार समाजाच्या समस्यांची माहितीही त्यांना देण्यात आली. केंद्र सरकारच्या ओबीसींच्या यादीत किंवा अन्य पोटजातीमध्ये जैन कलार समाजाचा अंतर्भाव करावा, अशी इच्छा उपस्थितांनी व्यक्त केली. सर्व वर्गीय कलार समाज या संघटनेचे अध्यक्ष भूषण दडवे, माजी आमदार अविनाश वारजुरकर, अशोक खानोरकर, अरविंद जयस्वाल, ध्रुवनारायण जयस्वाल, किशोर राय, नारायण टाले आदी उपस्थित होते.
निरंकारी सत्संग भवनात सांस्कृतिक कार्यक्रम
पाचपावलीतील निरंकारी सत्संग भवनमध्ये हरदेवसिंग यांच्या गीतांवर आधारित कविता, नाटक, नृत्य सादर करण्यात आले. निरंकारी मंडळाचे विभागीय प्रमुख झामनदास यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम पार पडला. मुलींनी गुरूवंदना नृत्य सादर केले. यासोबतच यावेळी हिंदी, सिंधी, बंगाली, मराठी, पंजाबी व इंग्रजीमधून गीते सादर करण्यात आली. एका पंजाबी नाटकात एक महिला मुलांबरोबर रेल्वेने जात असताना मुले आणि सहप्रवाशांना त्रास देत स्वत: त्रासिक मुद्रेने प्रवास करते. मात्र एक प्रेमळ निरंकारी भक्ताच्या सहनशीलतेमुळे तिचे हृदयपरिवर्तन होते. असा विषय हाताळणारे एक मराठी नाटक यावेळी सादर करण्यात आले. विनोदी नाटिका ‘नास्तिक सलून’च्या माध्यमातून ईश्वराच्या इच्छेशिवाय काहीच घडत नाही, असा संदेश देण्यात आला. ‘सच्ची दौलत’ हे नाटक आणि सिंधी नृत्य गीत लहान मुलींनी सादर केले. झामनदास यांचेही यावेळी भाषण झाले. संचालन नीलम, जयश्री आणि मोनिका सुमरा यांनी केले. नीलम जयसिंधानी यांनी आभार मानले.