Leading International Marathi News Daily

शुक्रवार, २६ जून २००९

(सविस्तर वृत्त)

बोटे तुटल्यानंतरही प्रितेशने मिळवले घवघवीत यश
नागपूर, २५ जून / प्रतिनिधी

कारंजा लाड येथे देवदर्शनासाठी जात असताना अमरावती मार्गावर आमची क्वालिस उलटून

 

झालेल्या अपघातात उजव्या हाताची बोटे तुटली. त्यावेळी मी चवथीत होतो. बोटांवर शस्त्रक्रिया करण्यात आल्यानंतर अपंग म्हणूनच वावरावे लागेल, असे डॉक्टरांनी सांगितल्याने मानसिकदृष्टय़ा खचून गेलो होतो. परंतु, देवावरचा विश्वास व आई-वडिलांनी घेतलेल्या मेहनतीमुळे त्यातून सावरलो आणि प्रचंड परिश्रमातूनच आजची यशाची चव चाखली, असे प्रितेश मातुरकरने सांगितले.
सोमलवार निकालस शाखेच्या अपंगातून राज्यात तिसरा आणि नागपूर विभागातून प्रथम आलेल्या प्रितेश प्रशांत मातुरकरला ९५.३८ गुण मिळाले आहेत. दहावीचे वर्ष असले तरी कुठल्याही दडपणाखाली अभ्यास केला नाही. शाळा आणि शिकवणी वर्गात होणाऱ्या अभ्यासाबरोबरच रोज तीन तास अवांतर अभ्यास केला. १६ फेब्रुवारी २००३ रोजी अपघात झाला त्यावेळी चवथीत होतो. उजव्या हाताची बोटे तुटल्याने लिहिता येणार नाही, अशी भीती वाटू लागली होती. आई-बाबांनी आणि डॉक्टरांनी माझ्यावर मेहनत घेतली. अनेक वर्ष डाव्या हाताने लिहित होतो. बाबांचे मित्र अभय भाकरे यांनी माझ्याकडून उजव्या हातानी लिहिता यावे आणि अक्षर चांगले यासाठी बरीच मेहनत करून घेतली. सुरुवातीला माझे अक्षर नीट येत नव्हते पण सराव केला.
प्रितेशला स्केटिंगच्या स्पर्धेत अनेक बक्षिसे मिळाली आहेत.भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्र त्याचे आवडते विषय. शिवाय वर्तमानपत्र वाचन आणि साहित्याची आवड असल्याचे प्रितेशने सांगितले. प्रितेशचे वडील डॉ प्रशांत मातुरकर होमिओपॅथिक डॉक्टर असून आई परिणिता गृहिणी आहे.