Leading International Marathi News Daily

शुक्रवार, २६ जून २००९

(सविस्तर वृत्त)

शनिवारी सामाजिक न्याय शिक्षण परिषद व चर्चासत्र
नागपूर, २५ जून / प्रतिनिधी

राष्ट्रीय परिवर्तन परिषदेतर्फे राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीदिनी येत्या शनिवारी सामाजिक न्याय

 

शिक्षण परिषद व चर्चासत्र आयोजित करण्यात आले आहे. सत्यशोधक समाजाचे अध्यक्ष महादेवराव चतारे यांच्या हस्ते सकाळी १० वाजता विदर्भ हिंदी साहित्य संमेलनाच्या सभागृहात परिषदेचे उद्घाटन होईल.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी परिषदेचे संयोजक प्रा. चंद्रशेखर चांदेकर तर, हेल्पेज इंडियाचे विभागीय व्यवस्थापक सुनील ठाकूर, कासार समाज युवक संघटनेचे अध्यक्ष प्रा. रमेश गान, राष्ट्रीय ओबीसी-बहुजन महासंघाचे प्रदेश सचिव डॉ. अनंत नास्नुरकर, मराठा सेवा संघाचे अध्यक्ष विजय शिंदे, अ‍ॅड. नामदेवराव गव्हाळे, रवींद्र गुजर प्रमुख पाहुणे राहतील. नागरिकांनी कार्यक्रमास उपस्थित रहावे, असे आवाहन श्याम पडोळे, राहुल देशमुख, श्याम दोनोडे, राजेंद्र भावळकर, कार्तिक नक्षिणे, मधुकर रोडगे, एस. रमेश, मधुरा अणेराव, ऋचिरा घोरमारे, समृद्धी पोहाणे, शाश्वत राजूरकर, सोहम वाटकर, भूषण खुरगे, संजय ठाकरे, मुश्ताक शेख, प्रशांत रोडगे, संजय साकुरे आणि शेखर ठाकरे आदींनी केले आहे.