Leading International Marathi News Daily

शुक्रवार, २६ जून २००९

(सविस्तर वृत्त)

निखिल मुंडले व पंकज दवंडे यांच्या प्रदर्शनाचे उद्घाटन
नागपूर, २५ जून / प्रतिनिधी

मुंडले एज्युकेशनल ट्रस्टच्या सेंट्रल इंडिया स्कूल ऑफ फाईन आर्टस्तर्फे (सिस्फा)

 

लक्ष्मीनगरातील सिस्फा की छोटी गॅलरी येथे ट्रस्टचे सचिव निखिल मुंडले व सिस्फाच्या छायाचित्रण विभागाचे प्रमुख पकंज दवंडे यांच्या छायाचित्रांच्या प्रदर्शनाचे आज उद्घाटन झाले. अंबुजा सिमेंटचे विदर्भ प्रांत प्रमुख रवींद्र राणे यांच्या हस्ते हे उद्घाटन झाले.
यावेळी प्रभाकर मुंडले, अनुराधा मुंडले, माग्रसचे सुधीर देव, सिस्फाचे अधिष्ठाता चंद्रकात चन्न्ो उपस्थित होते.
निखिल मुंडले यांचे ‘इंटीमेट पार्टनर’ व पंकज दवंडे यांचे ‘लाईट दॅट शाईन्स’ या शीर्षकाखालील छायाचित्रांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे.
यावेळी राणे म्हणाले, दोन्ही छायाचित्रकारांनी निसर्गाचे सुरेख असे चित्रण केले असून या चित्रांमुळे रसिकांना नक्कीच आनंद मिळेल. गिर्यारोहणामध्ये निखिल मुंडले यांना विशेष रुची आहे.
पंकज दवंडे यांचे व्यक्तीचित्रण, टेबलफोटोग्राफी, निसर्ग छायाचित्रण आणि अरण्य छायाचित्रण हे आवडते विषय आहे. जंगलातील घनदाट झाडातून अलगद शिरणारा सूर्यप्रकाश हा त्यांच्या प्रदर्शनाचा मुख्य विषय आहे. पहाटेच्यावेळी जंगलातील धुक्यासोबतचा प्रकाश, सायंकाळचा प्रकाश अशा अरण्यप्रकाशाच्या नानाविध छटा दवंडे यांनी कॅमेराबद्ध केल्या आहेत. कार्यक्रमाचे संचालन समीर हेजीब यांनी केले.