Leading International Marathi News Daily

शुक्रवार, २६ जून २००९

(सविस्तर वृत्त)

उत्सुकता आणि गर्दी
नागपूर, २५ जून / प्रतिनिधी

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेत

 

गुणवत्ता यादी बंद करण्यात आली असली तरी निकालाबाबत मात्र प्रत्येकाला उत्सुकता असल्यामुळे दिवसभर शहरातील सर्व शाळांमध्ये विद्यार्थी आणि पालकांची प्रचंड गर्दी दिसून आली.
आज सकाळी अकरा वाजता निकाल जाहीर होणार असल्यामुळे मंडळाच्या कर्मचाऱ्यांकडे विचारणा केली जात होती. इंटरनेट व मोबाईलवर निकाल पहायला मिळणार असल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांनी सायबर कॅफेत झुंबड उडाली होती. शहरातील आघाडीवरील शाळा म्हणून ओळखलेल्या सोमलवार हायस्कूल, धरमपेठ हायस्कूल, मुंडले हायस्कूल, हडस हायस्कूल, पं. बच्छराज व्यास विद्यालय, निकालस सोमलवार, व्ही.टी. कॉन्व्हेंट, संजुबा हायस्कूल, डी.डी. नगर, न्यू इंग्लिश, सी.पी. अँड बेरार, महात्मा गांधी सेटेंनियल हायस्कूल आदी शाळांमध्ये उत्साहाचे वातावरण होते.
शाळेतील शिक्षक मुख्याध्यापक गुणवत्ता विद्यार्थ्यांच्या घरी दूरध्वनी करून त्यांचे अभिनंदन करत होते. निकाल जाहीर झाल्यावर अनेक गुणवत्ता प्राप्त विद्यार्थी पालकांसह शाळेत आले होते. मोबाईलवरही अनेक मुले निकाल पाहण्यात दंग होती. गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांच्या घरी उत्साहाचे वातावरण होते. गेल्या दोन वर्षांपासून गुणवत्ता यादी नसल्यामुळे मंडळातर्फे गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांचे सत्कार समारंभ बंद झाल्यामुळे मंडळाच्या कर्मचाऱ्यामध्ये निकालाबाबत फारसा उत्साह दिसून आला नाही.