Leading International Marathi News Daily

शुक्रवार, २६ जून २००९

(सविस्तर वृत्त)

अश्विनीवर पारितोषिकांचा वर्षांव
नागपूर, २५ जून / प्रतिनिधी

दहावीच्या परीक्षेत नागपूर विभागातून पहिली आलेली सोमलवार माध्यमिक शाळा रामदासपेठची

 

विद्यार्थिनी अश्विनी मराठे हिने सर्वाधिक ७७५० रुपयांची पारितोषिके पटकावली आहेत तर मराठी द्वितीय भाषेत राज्यातून दुसरी आलेली चंद्रपूरच्या माऊंट कार्मेल कॉन्व्हेंट हायस्कूलची विद्यार्थिनी तनुश्री उपलेंचवार हिने तीन हजार रुपयांचे ‘अग्रलेखांचे बादशाह’ नीळकंठ खाडिलकर पारितोषिक पटकावले आहे.
मागासवर्गीयांमध्ये विभागातून पहिली आलेली विमलाताई तिडके कॉन्व्हेंटची तिशा गजभिये हिला १ हजार ७००, बाबा नानक सिंधी हिंदी हायस्कूलची भाग्यश्री मेश्राम हिला एक हजार ५०० रुपये तर विभागातून दुसरी आलेली सोमलवार माध्यमिक शाळा रामदासपेठची अश्मिका ढबाले हिला १ हजार ३५० रुपयांची पारितोषिके प्राप्त झाली आहेत.
अश्विनी मराठे हिला विभागातून पहिली आल्याबद्दल मंडळाचे १०००, मुलीतून पहिल्या क्रमांकासाठी ७५०, मधुकर गोविंदराव फडणीस एक शिक्षक पारितोषिकानिमित्त १०००, संस्कृत भाषेत प्रथम आल्याबद्दल नामदार जगन्नाथ शंकरशेठ संस्कृत पुरस्कारनिमित्त १०००, पहिली आल्याबद्दल माथुरकर परिवारातर्फे १०००, प्रतिभा झाडे व पुरुषोत्तम झाडे पारितोषिकानिमित्त १०००, वसुधा जोगळेकर पारितोषिकाचे १००० तसेच अनंत वामन गोगटे स्मृतिनिमित्त संस्कृत विषयासाठी १००० अशी एकूण ७७५० रुपयांची पारितोषिके प्राप्त झाली आहेत.
विभागातून दुसरी आलेली अश्मिका ढबाले हिला मंडळाचे ७५० तसेच मुलींमधून विभागात दुसरी आल्याबद्दल मंडळाचे ६०० रुपयांचे पारितोषिक मिळाले. विभागातून तिसरे आलेले मिहीर महाकाळकर व इंद्राणी मधुगिरी यांना मंडळाकडून प्रत्येकी ५०० रुपयांचे पारितोषिक मिळाले आहे. इंद्राणीला मुलींमधून तिसरी आल्याबद्दलही ५०० रुपयांचे बक्षीस मिळाले आहे. तिशा गजभिये हिला मागासवर्गीयांतून विभागातून पहिली आल्याबद्दल ७५०, बाबासाहेब आंबेडकर जन्मशताब्दी पारितोषिकाचे ५०० आणि माथुरकर परिवार पारितोषिकाचे ५०० रुपयांचे पारितोषिक प्राप्त झाले. आर.एस. मुंडले हायस्कूलचा रोहन धकिते याला मागासातून पहिला आल्याबद्दल मंडळाचे ७५० तसेच माथुरकर परिवाराचे ५०० रुपयांचे पारितोषिक मिळाले. हडस हायस्कूल रामदासपेठचा अभिषेक चन्न्ोवार याला मागासवर्गीयातून दुसरा आल्याबद्दल मंडळाचे ६०० रुपयांचे पारितोषिक प्राप्त झाले. सोमलवार माध्यमिक शाळेची संचिता बमनोटे हिला मागासवर्गीयातून तिसरी आल्याबद्दल मंडळाचे ५०० रुपयांचे, रात्रकालीन शाळांतून पहिला आलेला शिवाजी शाळेचा रमीझ आझाद बक्शी याला मंडळाचे ७५० रुपयांचे, अपंगातून पहिला आल्याबद्दल सोमलवार हायस्कूल निकालसचा प्रितेश मातुरकर याला ७५० रुपयांचे बक्षीस मिळाले. गुणवंत विद्यार्थ्यांना पारितोषिके देऊन त्यांचा गौरव करण्यासाठी २५५३३६० किंवा २५६०२०९ या क्रमांकांवर साधण्याचे आवाहन मंडळातर्फे करण्यात आले आहे.