Leading International Marathi News Daily

शुक्रवार, २६ जून २००९

(सविस्तर वृत्त)

नागपूर विभागात भंडारा अव्वल १९० शाळा ‘हंड्रेड पर्सेट’; ३ ‘झिरो पर्सेट’
नागपूर, २५ जून / प्रतिनिधी

नागपूर विभागातील २ हजार ३७७ पैकी तब्बल १९० शाळांचा निकाल ‘हंड्रेड पर्सेट’ लागला

 

असून तीन शाळांवर ‘झिरो पर्सेट’ निकालामुळे नामुष्कीची वेळ आली आहे. विभागात सर्वाधिक ८५.५१ टक्के निकाल भंडारा जिल्ह्य़ाचा लागला आहे.
नागपुरातील तब्बल ८८ शाळांचा निकाल १०० टक्के लागला आहे. या खालोखाल चंद्रपूरमधील ३० शाळांमधील सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले. वर्धा जिल्ह्य़ात फक्त १० शाळांचा निकाल १०० टक्के आहे. चंद्रपूरातील एका तर वर्धेतील दोन शाळांचा निकाल ‘झिरो पर्सेट’ आहे. या शाळांमधील एकाही विद्यार्थ्यांला यशस्वी होता आले नाही. गोंदिया जिल्ह्य़ातील २५ शाळांचा निकाल शंभर टक्के आहे. गडचिरोली २० आणि भंडाऱ्यातील १७ शाळांचा निकाल शंभर टक्के लागला आहे.
नागपूर विभागात भंडारा जिल्हा अव्वल स्थानावर आहे. या जिल्ह्य़ात २१ हजार ४९६ विद्यार्थ्यांपैकी तब्बल १८ हजार ३८२ विद्यार्थी अर्थात ८५.५१ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले. वर्धा जिल्ह्य़ाचा निकाल सर्वात कमी म्हणजे ७२.६५ टक्के आहे. जिल्ह्य़ात १९ हजार २४८ विद्यार्थ्यांपैकी १३ हजार ९८३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. एरवी नेहमी सर्वात शेवटी असणारा गडचिरोली जिल्ह्य़ाचा निकाल ८१.३२ टक्के असून तिसऱ्या स्थानावर आहे. या जिल्ह्य़ात १५ हजार ५९१ पैकी १२ हजार ६७८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.
गोंदियाचा निकाल ८३.७८ टक्के असून विभागात दुसऱ्या स्थानावर आहे. या जिल्ह्य़ात २२ हजार ७१२ विद्यार्थ्यांपैकी १९ हजार २८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. नागपूर जिल्ह्य़ात ६५ हजार २८३ विद्यार्थ्यांपैकी ५३ हजार ४ अर्थात ८१.१९ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले. चंद्रपूर जिल्ह्य़ात ३३ हजार ६७१ विद्यार्थ्यांपैकी २६ हजार ५४९ विद्यार्थी अर्थात ७८.८५ टक्के उत्तीर्ण झाले.