Leading International Marathi News Daily

शुक्रवार, २६ जून २००९

(सविस्तर वृत्त)

ओंकार पाटील पनवेलमध्ये प्रथम
पनवेल/प्रतिनिधी - गुरुवारी घोषित झालेल्या दहावी परीक्षेच्या निकालात नवीन पनवेल येथील चांगू

 

काना ठाकूर विद्यालयाचा ओंकार नितीन पाटील हा विद्यार्थी पनवेल तालुक्यात प्रथम आणि जिल्ह्यात दुसरा आला. त्याला ६५० पैकी ६१८ गुण (९५.०७ टक्के) मिळाले.
चांगू काना ठाकूर विद्यालयाच्या मराठी माध्यमाचा निकाल ९९.४३ तर इंग्रजी माध्यमाचा निकाल १०० टक्के लागला. या शाळेच्या मराठी माध्यमात अनिकेत राजेंद्र आंरद आणि स्मिता आनंद साळवी हे विद्यार्थी ६१७ गुण मिळवून विभागून दुसऱ्या क्रमांकावर आले, तर ६१४ गुण मिळविणारी मनीषा अजित केदारे ही विद्यार्थिनी तृतीय आली. द्वितीय क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या अनिकेत आंरदने नुकत्याच झालेल्या राज्य प्रज्ञा शोध परीक्षेत आठवा क्रमांक पटकावला आहे. यामुळे यावर्षी त्याने दुहेरी यश संपादन केले. या शाळेच्या इंग्रजी माध्यमात साईशा सतीश मोरे, पूर्वा प्रमोद गोखले आणि मधुरा भरत भगत या विद्यार्थिनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय आणि तृतीय आल्या. पनवेलच्या विठोबा खंडावा विद्यालयाचा निकाल ७९.८६ टक्के लागला. या शाळेतून रोहित अरुण यादव (९२.१५) हा विद्यार्थी प्रथम आला, तर रामचंद्र अविनाश घडशी (९०.९२) आणि सूरज रामचंद्र मोकल (९०.७६) हे विद्यार्थी अनुक्रमे द्वितीय आणि तृतीय आले. पनवेलमधील के. वि. कन्या विद्यालयाचा निकाल ८४.५३ टक्के लागला. या शाळेतून भूमिका सुरेश शहा ही विद्यार्थिनी ९४.९२ टक्के गुण मिळवून पहिली आली, तर श्वेता संजय पाटकर (९३.६९) आणि प्रियांका भरत जाधव (९२) या विद्यार्थिनी अनुक्रमे द्वितीय आणि तृतीय आल्या. नवीन पनवेलच्या के. ए. बांठिया विद्यालयाच्या मराठी विभागाचा निकाल ७२.४८ टक्के, तर इंग्रजी विभागाचा निकाल ९२ टक्के लागला. या शाळेच्या मराठी विभागात अक्षयराज अशोक सावंत (९०.६१), कमलेश गणपत कदम (८९.५३) हे विद्यार्थी प्रथम आणि द्वितीय आले, तर ज्ञानेश्वर हरिदास कदम आणि दीप्ती पांडुरंग घरत या विद्यार्थ्यांनी ८७.३८ टक्के मिळवून विभागून तृतीय क्रमांक पटकावला. इंग्रजी विभागात चैताली विलास पाटील (८८.७६), रसिका जालंदर कुंभार (८८.६१) आणि निरंजन नारायण जळके (८६.१५) हे विद्यार्थी अनुक्रमे प्रथम, द्वितीय आणि तृतीय आले. पनवेल तालुक्याचा निकाल ८२.१८ टक्के तर रायगड जिल्ह्याचा निकाल ७९.६९ टक्के लागला.