Leading International Marathi News Daily

शुक्रवार, २६ जून २००९


नाशिक विभागात सर्वप्रथम येण्याचा मान पटकावणाऱ्या गौरव पालटशहा व कुमुदिनी अहिरे यांचे शाळेत उत्स्फूर्त स्वागत झाले. गौरवचे पुष्पहार घालून तर कुमुदिनीला पेढे भरवून स्वागत करण्यात आले.

चाळीसगावची कुमुदिनी अहिरे व चोपडय़ाचा गौरव पालटशहा विभागात अव्वल
* दहावीच्या गुणवंतांमध्ये ग्रामीण भागाची मुसंडी * उत्तीर्णामध्ये जळगावची आघाडी

प्रतिनिधी / नाशिक

यंदाच्या दहावीच्या परीक्षेत चाळीसगावच्या आनंदीबाई बंकट गर्ल्स हायस्कूलची कुमुदिनी अहिरे आणि चोपडा येथील प्रताप विद्यामंदिराचा गौरव पालटशहा या दोघांनी प्रत्येकी ९५.५३ टक्के गुण प्राप्त करत विभागात सर्वप्रथम येण्याचा मान मिळविला. हे दोघेही ग्रामीण भागातील असून शहरी भागातील विद्यार्थ्यांवर त्यांनी आघाडी घेतली आहे, हे विशेष. नाशिकच्या सी.डी.ओ. मेरी हायस्कूलचा आकाश कोळी (९५.२३) हा विभागात दुसरा आला तर जळगावच्या सेंन्ट लॉरेन्स हायस्कूलचा श्रीनिकेत पाटील आणि सावखेडा बुद्रकच्या बी. जी. शानबाग विद्यालयाचा राजन जयकर या दोघांनी प्रत्येकी ९५.०७ टक्के मिळवत तिसरा क्रमांक पटकावला.

अभ्यासातील सातत्य हे गुणवंतांच्या यशाचे गमक
नाशिक / प्रतिनिधी

विभागात दहावीच्या परीक्षेत प्राविण्य मिळविलेल्या बहुतांशी गुणवंताचा कल हा विज्ञान शाखेकडे असून आपल्या यशाचे गमक म्हणजे अभ्यासातील सातत्य हे असल्याची प्रतिक्रिया बहुतेक गुणवंतांनी व्यक्त केली आहे. काहींनी खासगी क्लास, शाळेतील शिकवणी व केवळ स्वत काढलेल्या नोट्सला महत्व दिले. गुणवंताच्या या काही प्रतिक्रिया-

बेशिस्त दुचाकी चालकांविरूध्द कारवाई
* ५६ वाहने जप्त * अवैध नंबरप्लेट प्रकरणी ७५ जणांविरूध्द कारवाई * सात हजार ५०० रूपयांची दंडवसुली

नाशिक / प्रतिनिधी
शहरातील गुन्हेगारीला आळा घालण्याबरोबरच पोलीस आयुक्तांनी आता येथील बेशिस्त वाहतुकीला शिस्तीत आणण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. वाहतूक विभागाने कॉलेजरोड, महात्मानगर परिसरात भरधाव जाणाऱ्या दुचाकी ताब्यात घेण्याची मोहीम सुरू केली आहे. याशिवाय शालेय विद्यार्थ्यांना वाहतूक नियमाबाबत माहिती व्हावी यासाठी शहरातील विविध शाळांमध्ये प्रबोधनही करण्यात येत आहे.

रहस्यमय ‘प्रतिबिंब’ पूर्णत्वाच्या मार्गावर
नाशिक येथील स्मित मुव्हीजच्या पहिल्या ‘प्रतिबिंब’ या मराठी चित्रपटाचे चित्रिकरण पूर्णत्वाच्या मार्गावर असून नाशिकमध्ये नुकतेच एका गाण्याचे चित्रिकरण करण्यात आले. यानिमित्ताने आयोजित पत्रकार परिषदेत कलाकार, दिग्दर्शक व निर्मात्यांनी चित्रिकरणाच्या एकूणच प्रगतीबद्दल समाधान व्यक्त केले. चित्रपटाचे खास आकर्षण सोनाली कुलकर्णी असून तिने मराठी कलाकारांच्या दर्जाविषयी ठाम मत व्यक्त केले. हिंदी चित्रपटसृष्टीत काम करत असतांना मराठी कलावंताना भरपूर सन्मान मिळतो. याचे कारण मराठी कलावंताचे कौशल्य असले तरी आधीच्या पिढीने आपल्या कामाने नवोदितांना एक व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे.


शालान्त प्रमाणपत्र परीक्षेत नाशिक विभागात दुसरा आलेल्या नाशिक येथील सी.डी.ओ. मेरी हायस्कूलमधील आकाश कोळी आपला आनंद आई, वडिलांसोबत व्यक्त करताना.


नाशिक विभागात दहावीच्या परीक्षेत मुलींमध्ये तृतीय आलेल्या नाशिकच्या किलबिल सेंट जोसेफ हायस्कूलची हीना उगले आईसोबत.


नाशिक विभागात सर्वप्रथम आलेल्या चोपडा येथील प्रताप विद्यामंदिरच्या गौरव पालटशहाला पेढा भरविताना आजी. समवेत आई-वडील.

चोरीस गेलेल्या मोबाईलच्या क्रमांकावरून चोरटय़ाचा माग
मनमाड / वार्ताहर

धावत्या रेल्वेत महिलेच्या पर्समधील दागिने व मोबाईल अशी सुमारे दीड लाख रुपयांची चोरी करणाऱ्या संशयितास चोरीस गेलेल्या मोबाईलच्या क्रमांकावरून माग काढत मनमाड लोहमार्ग पोलिसांनी अटक केली. २७ मे रोजी नाशिक ते लासलगाव दरम्यान धावत्या गाडीत ही घटना घडली. शशी सुनिल शर्मा ही जळगावची महिला ८०२९ डाऊन कुर्ला-हावडा एक्स्प्रेसने कल्याण ते जळगाव असा प्रवास करीत होती. नाशिकमधून गाडी सुटल्यावर त्यांना झोप लागली. त्याचा फायदा घेत या संशयिताने पर्स लंपास केली. त्यात एक लाख ७८ हजार रुपयांचा ऐवज होता. मनमाडला गाडी आल्यानंतर संबंधित महिलेने लोहमार्ग पोलिसांकडे तक्रार दिली. चोरीस गेलेल्या मोबाईल क्रमांकावरून पोलिसांनी या घटनेचा तपास सुरू केला. संबंधित मोबाईल कंपनीशी संपर्क ठेवत लोहमार्ग पोलिसांनी प्रविण अर्जुन भालेराव (रा. येवला) यास अखेर जेरबंद केले.

भोसला मिलिटरी स्कूलच्या कमांडंटपदी सहरावत
नाशिक / प्रतिनिधी

येथील भोसला मिलिटरी स्कूलच्या कमांडंटपदी कर्नल एस. एस. सहरावत यांची नियुक्ती करण्यात आली आहे, अशी माहिती म. हिं. सै. शि. मंडळाचे कार्यवाह दिवाकर कुलकर्णी यांनी दिली.
सहरावत हे गेली ३३ वर्षे भारतीय लष्करी सेवेत होते. त्यांनी गढवाल रायफल रेजिमेंटमध्ये असताना भारताच्या जम्मू आणि काश्मिर, अरूणाचल प्रदेश, सिक्कीम, आसाम भागातील सरहद्द असलेल्या ठिकाणी कार्य केले आहे. या व्यतिरिक्त ‘ऑपरेशन विजय’ मध्ये लाइन ऑफ कंट्रोलवर १६ गढवाल रायफलची कमांड सांभाळली आहे. कारगील युद्धातील कामगिरीबद्दल तत्कालिन राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्याहस्ते विशिष्ट सेवा मेडल देऊन वर्ष २००० मध्ये त्यांना सन्मानित केले गेले.