Leading International Marathi News Daily

शुक्रवार, २६ जून २००९

कक्का स्क्वेअर
सुधीर जोगळेकर

२२ जुलैनंतर काय घडणार?
कक्का स्क्वेअर हा स्तंभ सुरू होऊन दोनेक र्वष होत आली, पण अजूनही या नावाविषयीचं कुतूहल अनेक वाचकांमध्ये आहे, हे समक्ष भेटींमध्ये आणि पत्रव्यवहारातून जाणवत राहिलं आहे.. हा स्तंभ आहे देशाच्या चार सीमांमध्ये घडणाऱ्या घटनांवर आधारलेला.. कक्का हे त्या सीमांचं लघुरूप.. दक्षिणेचं कन्याकुमारी ते उत्तरेचं काश्मीर आणि पश्चिमेचं कच्छ ते पूर्वेचं कामरूप हे अंतर निर्देशित करणारं हे लघुरूप. 'क' ते 'का' आणि 'क' ते 'का' असं दोन वेळा सूचित करावं लागत असल्यानं त्याचं केलेलं कक्का स्क्वेअर हे लघुनामांकन..
जुलै महिन्यात येणारं खग्रास सूर्यग्रहण भारताला कोणत्या दिशेनं घेऊन जाणार याविषयीचे अंदाज वर्तवायला ज्योतिष्यांच्या वर्तुळात केव्हाच प्रारंभ झाला आहे.. तीन वर्षांपूर्वीच्या अतिवृष्टीसारखी स्थिती येऊन मुंबई पुन्हा एकदा जलमय होणार की आणखी एका दहशतवादी हल्ल्याला मुंबईला वा देशाला सामोरं जावं लागणार हे विषय त्या चर्चेत प्रामुख्यानं आहेत.. पण त्याचबरोबर या ग्रहणाचे परिणाम केंद्रातल्या आणि राज्यातल्या सरकारांवर कसकसे होणार याचीही रंगतदार चर्चा भविष्यवेत्त्यांमध्ये रंगतदारपणे सुरू आहे.. पक्षोपक्षांच्या आणि नेते मंडळींच्या कुंडल्या नव्यानं मांडल्या जाऊ लागल्या आहेत.. पण या चर्चेत गेल्या आठवडय़ात नवी भर पडली आहे, ती श्री श्री रवि शंकरांचे शिष्य डी. के. हरी आणि त्यांची पत्नी डी. हेमा हरी यांनी लिहिलेल्या एका पुस्तकाद्वारे उपस्थित करण्यात आलेल्या प्रश्नांची..

इंटरेस्टिंग!
कलश आदिवासींची कथा
पाकिस्तानातील आदिवासीबहुल भागांत दहशतवाद वाढत असल्याने या प्रांतावर पाकिस्तान आणि अमेरिकेने लक्ष केंद्रित केले आहे. पाकिस्तानातील आदिवासींमध्ये काही जमाती अशा आहेत ज्या वैदिक परंपरेला जवळच्या आहेत. त्यातीलच एक जमात आहे ‘कलश’. चित्राल जिल्ह्यातील डोंगराळ भागात नांदत असलेले हे कलश आदिवासी देवतापूजक आहेत. निसर्गातील प्रतीके याच त्यांच्या देवता आहेत. त्यांचे सणवार, नैमित्तिक कार्ये यात या निसर्ग प्रतीकांना महत्त्वाचे स्थान आहे. कलश आदिवासी आपल्या परंपरा आणि आपले वेगळेपण जाणीवपूर्वक जोपासतात. म्हणूनच त्यांना काफिर कलश म्हणूनही ओळखले जाते.

घडामोडी
विदर्भ
तांदळाच्या तस्करीचे गौडबंगाल!
आंध्रप्रदेश व छत्तीसगडला लागून असलेल्या पूर्व विदर्भातून सागवान लाकडाची तस्करी होते, हे सर्वाना ठावूक आहे. आता त्यात आणखी एका तस्करीची भर पडली आहे. गेल्या काही वर्षांत या भागात बऱ्यापैकी राजकीय वर्चस्व ठेवून असणारे बडे व्यापारी आता तांदळाचीही तस्करी करू लागले आहेत. पूर्व विदर्भ उच्चप्रतीच्या तांदूळ उत्पादनासाठी सर्वत्र प्रसिद्ध आहे. येथील तांदूळ निर्यातही होतो. मात्र, शासनाशी संबंधित तांदळाच्या खरेदी-विक्रीत गुंतलेल्या व्यापाऱ्यांनी हा तस्करीचा नवा फंडा सुरू केला आहे.
आठ दिवसांपूर्वी चंद्रपूरचे खासदार हंसराज अहीर यांनी तांदळाची वाहतूक करणारी एक रेल्वेगाडीच पकडली.