Leading International Marathi News Daily

शुक्रवार, २६ जून २००९

राज्य


दहावीचा निकाल लागताच अकरावीच्या प्रवेशाकरिता अर्ज घेण्यासाठी महाविद्यालयांकडे विद्यार्थ्यांसह पालकांनीही मोर्चा वळविला. नाशिकमध्ये एचपीटी आर्टस्, बीवायके कॉमर्स, अ‍ॅण्ड आरवायके कॉलेज असो किंवा केटीएचएम महाविद्यालय असो, सर्वच महाविद्यालयांमध्ये अशा रांगा लागल्या होत्या.

दहावीचे यशस्वी
ऐश्वर्य शिवगण संगमेश्वर तालुक्यात पहिला

संगमेश्वर, २५ जून/वार्ताहर
माध्यमिक शालांत परीक्षेत संगमेश्वर तालुक्याचा निकाल ८१.७५ टक्के लागला असून देवरुख हायस्कूलचा ऐश्वर्य तुकाराम शिवगण याने ९६ टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे. संगमेश्वर येथील पैसाफंड इंग्लिश स्कूलचा निकाल ८२.२५ टक्के लागला असून १८६ पैकी १५३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. प्रशालेतील कौशिकी सुभाष केदारी (प्रथम, ९४.४६), भाग्यश्री शैलेंद्र भोसले (द्वितीय ९३.२३), तेजश्री दिलीप रहाटे (तृतीय, ९०.४३), अनुजा अनिल भिडे (८९.८४) व केतन दीपक भाटकर (८७.३८) यांनी उल्लेखनीय यश मिळविले आहे.

श्रुती सावंत व पूजा ठाकूर सिंधुदुर्गात पहिल्या
सावंतवाडी, २५ जून/वार्ताहर

सिंधुदुर्ग जिल्ह्यात शालांत माध्यमिक परीक्षेत कुडाळ हायस्कूलची श्रुती दिलीप सावंत व मालवण टोपीवाला हायस्कूलची पूजा ठाकूर हिने ९६.७६ टक्के गुण मिळवून प्रथम येण्याचा मान पटकाविला. त्यामुळे प्रथम क्रमांक विभागला गेला. कोल्हापूर बोर्डात मागासवर्गीय विद्यार्थ्यांंत प्रथम तीन क्रमांकात एस. एम. हायस्कूल कणकवलीचा सुमित सुनील वाघवडे ९६.१५ टक्के गुण मिळवून चमकला. जिल्ह्यात एस. एम. हायस्कूलचा सुशांत वसंत कदम ९६.४६ टक्के द्वितीय क्रमांकाने, तर मुक्ती अनिल कांबळी तृतीय क्रमांकाने चमकली.

खालापूरच्या प्रिया स्कूलची श्रीदेवी मुथकोड तालुक्यात पहिली
खोपोली, २५ जून/वार्ताहर

मार्च २००९ मध्ये घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेचा निकाल गुरुवारी जाहीर झाला. तालुक्याचा एकत्रित निकाल ६८.८० टक्के लागला. रसायनी येथील प्रिया स्कूलची श्रीदेवी मुथकोड ही विद्यार्थिनी ९७.२३ टक्के गुण मिळवून तालुक्यात पहिली आली आहे. खालापूर तालुक्यातील इंग्रजी माध्यमाच्या प्रिया स्कूल (रसायनी)- आनंद शाळा, कारमेल कॉन्व्हेंट स्कूल, झेनिथ स्कूल, शिशुमंदिर, जे. सी. महिंद्र स्कूल (सर्व खोपोली) व खोपोली न. पा. उर्दू माध्यमिक शाळा-हाळ (खोपोली) या सात शाळांचा निकाल १०० टक्के लागला.

कर्जतचा प्रतीक जुईकर तालुक्यात सर्वप्रथम
कर्जत, २५ जून/वार्ताहर

येथील अभिनव ज्ञानमंदिर प्रशालेच्या प्रतीक चंद्रशेखर जुईकर या विद्यार्थ्यांने ९४.७६ टक्के गुण मिळवून यंदाच्या माध्यमिक शालांत परीक्षेत तालुक्यात सर्वप्रथम येण्याचा बहुमान प्राप्त केला आहे. याच प्रशालेच्या मिलिंद राजू मोरे या विद्यार्थ्यांने ९४ टक्के गुण मिळवून प्रशालेत द्वितीय क्रमांक, तर मागासवर्गीय विद्यार्थ्यांमध्ये संपूर्ण तालुक्यामध्ये प्रथम क्रमांक पटकावला आहे. याच प्रशालेतील चेतन दत्तात्रेय निलधे या विद्यार्थ्यांने ९२.७६ टक्के गुण मिळवून प्रशालेमध्ये तृतीय क्रमांक प्राप्त केला.

गोपीनाथ मुंडे ‘मराठवाडा भूषण’
प्रवीण बर्दापूरकर, चंद्रकांत कुळकर्णी, श्रद्धा बेलसरे, अरुण कायगावकर ‘मराठवाडा गौरव’

औरंगाबाद, २५ जून / प्रतिनिधी

मराठवाडा लोकविकास मंचच्या वतीने देण्यात येणाऱ्या ‘मराठवाडा भूषण’ सन्मानासाठी भाजप नेते खासदार गोपीनाथ मुंडे तर, ‘मराठवाडा गौरव’ सन्मानासाठी ‘लोकसत्ता’च्या नागपूर आवृत्तीचे निवासी संपादक प्रवीण बर्दापूरकर, नाटय़ दिग्दर्शक चंद्रकांत कुळकर्णी, व्यावसायिक अरुण कायगावकर, साखर उद्योजक बी.बी. ठोंबरे आणि माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या संचालक श्रद्धा बेलसरे यांची निवड करण्यात आली आहे.

महाडची पृथा पाटील दक्षिण रायगडमध्ये प्रथम
महाड, २५ जून/वार्ताहर

मार्च २००९ च्या शालांत परीक्षेमध्ये येथील कोकण एज्युकेशन सोसायटीच्या कै. पार्वतीबाई थरवळ कन्या विद्यालयाची पृथा गंभीर पाटील ही ९५.५३ टक्के गुण मिळवून दक्षिण रायगड जिल्ह्यात सर्वप्रथम आली आहे. परांजपे विद्यामंदिर महाडचा उदयसिंह सुधाकर काटकर याने ९४.६१, तर के. ई. एस. इंग्रजी माध्यमिक विद्यालय महाडची सायली संजय जगताप हिने ९४.७६ गुण मिळविले आहेत. थरवळ कन्या विद्यालयातील स्नेहल चौधरी हिने ९३.८४, प्राची पांडे हिने ९२ टक्के गुण मिळविले. परांजपे विद्यामंदिरातील प्रणव हिरवे (९२.४६), सिद्धेश सागवेकर याने ९२ टक्के गुण मिळविले. के. ई. एस. इंग्रजी माध्यमिक विद्यालयातील अभिषेक ठाकूर याने ९४ टक्के, तर अलोक शेट याने ९३.३५ टक्के गुण मिळविले. अलोक याला संस्कृत विषयामध्ये १०० पैकी ९९ गुण मिळाले.

रायगडचा ७९.६९ टक्के निकाल
फातिमा खानला उर्दू भाषेसाठी बोर्डाची दोन पारितोषिके
अलिबाग, २५ जून/प्रतिनिधी

मार्चमध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेत रायगड जिल्ह्याचा निकाल ७९.६९ टक्के लागला आह़े म्हसळा तालुक्यात आंबेत येथील सावित्री माध्यमिक विद्यामंदिराची विद्यार्थिनी फातिमा अब्दुल मतीन खान हिने उर्दू भाषा विषयात ९८ गुण मिळवून, ती बोर्डाच्या मौलाना मुसन्ना मिया पारितोषिक व कोकण र्मकटाईल हार्बर क्रिस्ट या दोन पारितोषिकांची मानकरी ठरली आह़े

कोएसो मध्ये ९५.५३ टक्के मिळवून पृथा पाटील प्रथम
कोकण एज्युकेशन सोसायटी या संस्थेच्या सर्व शाळांमध्ये महाड येथील थरवळ कन्या शाळेची कु़ पृथा गंभीर पाटील ही ९५.५३ टक्के गुण मिळवून प्रथम आली आह़े ९५.२३ टक्के गुण मिळवून रोहा येथील मेहेंदळे हायस्कुलचा प्रसाद सदानंद तांडेल द्वितीय तर पनवेल येथील क़े व्ही़ कन्या शाळेची भूमिका सुरेश शहा ९४.९२ टक्के गुण मिळवून तिसरी आली आह़े

रत्नागिरी जिल्ह्याचा निकाल ८२.१६ टक्के
रत्नागिरी, २५ जून/खास प्रतिनिधी

मार्चमध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालांत परीक्षेत रत्नागिरी जिल्ह्याचा निकाल ८२.१६ टक्के लागला. जिल्ह्यातील एकही विद्यार्थी कोणत्याही गटात पहिल्या क्रमांकाचा मानकरी ठरू शकला नाही. पण चिपळूणच्या युनायटेड इंग्लिश स्कूलची नम्रता चंद्रकांत कासार ही विद्यार्थिनी मागासवर्गीय विद्यार्थ्यांमध्ये कोल्हापूर विभागात दुसरी आली. तिला ९६.७६ टक्के गुण मिळाले आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातील ३७० माध्यमिक शाळांमधून एकूण २४ हजार ६०८ विद्यार्थी परीक्षेला बसले होते, त्यापैकी २० हजार २१९ उत्तीर्ण झाले आहेत. चिपळूण तालुक्याचा निकाल सर्वात जास्त (८६.८० टक्के) लागला आहे.

वसईचा संकेत पाटील दुसरा
नालासोपारा, २५ जून/वार्ताहर

वसई कोळीवाडा येथील सेंट अ‍ॅन्थनी स्कूलमधील संकेत पाटील हा विद्यार्थी ९६.३० टक्के मिळवून मुंबईत दुसरा आला. सर्वस्तरांतून त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षांव होत आहे. सेंट अ‍ॅन्थनी स्कूलचेही हे पहिलेच यश आहे. ऐन परीक्षेच्या कालावधीत संकेतची आई गंभीर आजारी होती, पण त्याही परिस्थितीत गोंधळून न जाता हॉस्पिटल व अभ्यास यांचा मेळ बसवून संकेतने हे यश संपादन केले आहे. आय. टी. इंजिनीअर बनण्याचे संकेतचे स्वप्न आहे. संकेतबरोबरच त्याच्या शाळेतील चिराग वर्तक याने ९५.०७ टक्के, तर ओंकार मराठे याने ९४.२६ टक्के मिळवून शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे.

धोकादायक इमारतीतील शाळेत मुलांना न पाठविण्याचा इशारा
सोयगाव, २५ जून/वार्ताहर

तालुक्यातील फर्दापूर येथील धोकादायक इमारतीत शाळा भरवू नये म्हणून पालकांनी मुलांना शाळेत न पाठविण्याचा इशारा दिला आहे.

कौसल्या लोहकरे यांना मुक्त विद्यापीठाचा श्रमसेवा पुरस्कार
नाशिक, २५ जून / वार्ताहर

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या वतीने देण्यात येणाऱ्या श्रमसेवा पुरस्कारासाठी नागपूरच्या कौसल्या लोहकरे यांची निवड करण्यात आली आहे. आपल्या श्रम आणि सेवेने उपेक्षित वर्गातील महिलांची उन्नती करणाऱ्या महिलेला किंवा महिलांच्या संस्थेला हा पुरस्कार दिला जातो. १० हजार रुपये रोख, स्मृतिचिन्ह व सन्मानपत्र असे पुरस्काराचे स्वरुप आहे. त्यांनी बचत गटामार्फत सामूहिक शेतीचे नाविन्यपूर्व प्रयोगाबद्दल त्यांना हा पुरस्कार प्रदान केला जाणार आहे. निवड प्रक्रियेसाठी प्र-कुलगुरू डॉ. पंडित पलांडे, प्र-कुलगुरू डॉ. ए. डी. सावंत आणि डॉ. अजय कांबळे यांच्या समितीने काम पाहिले. पुरस्कार वितरण एक जुलै रोजी नागपूर येथे होणार आहे.ल्ल

रत्नाकर नांगरे यांचा सत्कार
सांगली, २५ जून / प्रतिनिधी

संजय गांधी निराधार योजनेचे नूतन अध्यक्ष रत्नाकर नांगरे यांचा आढावा बैठकीत सत्कार करण्यात आला. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी तहसीलदार श्रीमती संगीता चव्हाण होत्या.

लाच घेताना महिला उपनिरीक्षकाला अटक
डोंबिवली, २५ जून/प्रतिनिधी

डोंबिवलीतील विष्णुनगर पोलिस ठाण्यातील महिला पोलिस उपनिरीक्षक शशिकला काकरे यांना गुरूवारी संध्याकाळी दहा हजार रूपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी रंगेहाथ पकडले. गरीबाचा वाडा येथील रहिवासी प्रमोद दत्तू पाटील यांचा त्यांच्या चाळीत राहणाऱ्या भाडेकरू रूपाली देवरूखकर यांच्याबरोबर भाडय़ावरून न्यायालयात दावा आहे. प्रमोद पाटील यांच्याविरुद्ध रूपाली यांनी पोलिसात अर्ज केला होता. रूपाली यांच्या अर्जाची चौकशी करून महिला पोलिस उपनिरीक्षक शशिकला काकरे यांनी प्रमोद पाटील यांना बोलावून तुमच्या विरूध्द नार्कोटिक्सचा गुन्हा दाखल करते अशी दटावणी केली. यामधून सुटका करून घ्यायचा असेल तर दहा हजार रूपये देण्याची मागणी केली. प्रमोद यांनी एसीबीला याप्रकरणी कळविले. एसीबीने सापळा लावून आज पोलिस ठाण्यात काकरे यांना लाच घेताना रंगेहाथ पकडले.