Leading International Marathi News Daily

शुक्रवार, २६ जून २००९

(सविस्तर वृत्त)

धुळे जिल्ह्य़ातील ग्रामीण भागाच्या विकासासाठी प्रयत्नशील - खा. सोनवणे
धुळे / वार्ताहर
शिवसेना आणि भाजपच्या प्रामाणिक कार्यकर्त्यांच्या बळावर आपण निवडून आलो आहोत. जिल्हा

 

परिषद, पंचायत समितीत शिवसेनेची सत्ता असल्याने ग्रामीण भागातील चाळीस वषार्ंचा विकास कामांचा अनुशेष दूर करण्यासाठी आपण खासदार या नात्याने डोळसपणे काम करू, अशी ग्वाही खा. प्रतापदादा सोनवणे यांनी दिली. वरखेडे ग्रामपंचायतीच्या इमारतीच्या भूमिपूजन प्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी शिवसेनेचे नेते प्रा. शरद पाटील हे होते.
वरखेडे ग्रामपंचायतीला धुळे जिल्हा परिषद अंतर्गत इमारत बांधण्यासाठी पाच लाख रूपयांचा निधी देण्यात आला आहे.
या निधीतून सदर काम होणार असून पहिल्यांदाच स्वमालकीची ग्रामपंचायतीची इमारत होणार आहे. तालुक्यातील विकास कामांच्या बाबतीत सहकार्य करण्याचे आश्वासन सोनवणे यांनी दिले. याप्रसंगी जिल्हा परिषद कृषी सभापती प्रा. अरविंद जाधव, पंचायत समिती सभापती कमलताई बलसाणे, उपसभापती कैलास पाटील, भाजपचे बापू खलाणे, सरपंच देवराम माळी, उपसरपंच देवका माळी आदी उपस्थित होते.