Leading International Marathi News Daily

शुक्रवार, २६ जून २००९

मागासवर्गीय विद्यार्थ्यांमध्ये प्रथम येण्याचा मान मिळविलेली अंजली जाधव म्हणते..
यशात ‘लोकसत्ता’च्या ‘यशस्वी भव’चाही वाटा

मुंबई, २५ जून / प्रतिनिधी

अंजली जाधव.. शाळेत नेहमी मागच्या बाकावर बसणारी विद्यार्थिनी.. अभ्यासात हुशार आणि वक्तशीर.. पण तिने दहावीच्या परीक्षेत मागासवर्गीय विद्यार्थ्यांमध्ये प्रथम येण्याचा मान मिळविला आहे. अ. भि. गोरेगावकर इंग्लिश स्कूलची विद्यार्थिनी अंजली दहावीच्या परीक्षेत ९५.८४ टक्के गुण मिळवून मागासवर्गीयांमधून मुंबईत प्रथम आली आहे. या सगळ्या यशात ‘लोकसत्ता’च्या यशस्वी भवचाही वाटा असल्याचे अंजलीने नमूद केले. आम्ही यशस्वी भवची कात्रणे कापून ठेवायचो. वर्गात रिकाम्या तासाला ती वाचत बसायचो. या मुळे आम्हाला खूप मार्गदर्शन मिळाले अशी प्रतिक्रिया अंजलीने व्यक्त केली. अंजली

शिल्पाला व्हायचे आहे आयएएस
उमरगा, २५ जून/वार्ताहर

राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतलेल्यामाध्यमिक शालान्त अर्थात दहावीच्या परीक्षेत श्रमजीवी शिक्षण संस्थेच्या आदर्श विद्यालयाची शिल्पा बसवराज हिरेमठ (स्वामी) हिने ९८.६१ टक्के गुण मिळवून राज्यात पहिला क्रमांक पटकावला.

श्रुतीला व्हायचेय काíडओ सर्जन
बुलढाणा, २५ जून / प्रतिनिधी

राज्यातून दुसरी व विदर्भातून सर्वप्रथम येण्याचा मान मिळवणाऱ्या श्रृती सुरुशेची काíडओ सर्जन होण्याची इच्छा असून लातूरच्या राजर्षी शाहू महाविद्यालयात अकरावीसाठी प्रवेश घेणार असल्याचे श्रुतीने ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले. बुलढाण्याच्या मुठ्ठे लेआऊटमधील उत्कर्ष हॉस्पिटलचे संचालक डॉ. अशोक सुरुशे व डॉ. निर्मला सुरुशे या डॉक्टर दांपत्याची श्रुती ही कन्या. भारत विद्यालयाच्या या गुणवंत विद्यार्थिनीने ९७.६९ टक्के मिळवले आहेत. दहावीची संपूर्ण तयारी करून घेण्याची भारत विद्यालयाची कार्यपद्धती अतिशय प्रेरणादायी असल्याचे सांगून यशाचे सारे श्रेय तिने शाळेतील शिक्षकांना दिले. श्रुती म्हणाली, नियमित अभ्यासाबरोबरच प्राचार्य कुसुंबे, वर्ग शिक्षक, विषय शिक्षकांनी चांगली तयारी करून घेतली. शहरातील ओम क्लासेसचा चांगला फायदा झाला. जास्तीत जास्त ९५ टक्के गुण मिळतील अशी अपेक्षा होती. त्यामुळे आजचा निकाल अनपेक्षित होते.

मिळालेल्या यशाने संतुष्ट - अश्विनी मराठे
नागपूर, २५ जून / प्रतिनिधी

केवळ सात गुणांनी राज्यातून पहिली येण्याचा मान हुकला असला, तरी याची अजिबात खंत नाही. मिळालेल्या यशाने संतुष्ट आहे, अशी प्रतिक्रिया अश्विनी मराठे हिने ‘लोकसत्ता’शी बोलताना व्यक्त केली. विभागातून पहिले आणि राज्यातून तिसरे येण्याची कधी कल्पनाही केली नव्हती त्यामुळे ज्यावेळी सकाळी वृत्त वाहिन्यांवर बातमी कळली तेव्हा असं खरंच घडलं आहे यावर विश्वासच बसत नव्हता, अशी प्रांजळ कबुलीही तिने दिली.

शारीरिक व्यंगावर मात करून परीक्षितने गाठले यशाचे शिखर
पनवेल, २५ जून/प्रतिनिधी

हाडांच्या ठिसूळपणाच्या जन्मजात व्याधीमुळे शरीराची वाढ खुंटलेली, वडीलांचे अकाली निधन आणि शिवणकाम करून उदरनिर्वाह करणारी आई.. अशा प्रतिकूल परिस्थितीत परीक्षित दिलीप शहा या जिद्दी विद्यार्थ्यांने दहावीच्या परीक्षेत ८०.४६ टक्के गुण मिळवून आदर्श निर्माण केला आहे. शारीरिक व्यंग असूनही लेखनिक न घेता स्वत:च्या उत्तरपत्रिका स्वत: लिहीणाऱ्या परीक्षितने ६५० पैकी ५२३ गुण मिळवून ८०.४६ टक्क्यांपर्यंत मजल मारली.

शिक्षण मंडळाचे तणावमुक्त परीक्षा अभियान
मुंबई, २५ जून / प्रतिनिधी

दहावी व बारावीच्या परीक्षांना कमालीचे महत्त्व प्राप्त झाले आहे. पालक, शिक्षक व समाजाकडूनही विद्यार्थ्यांबद्दल अपेक्षा वाढत आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना कमालीच्या तणावाला सामोरे जावे लागते. त्यातून विद्यार्थी आत्महत्या करण्यास प्रवृत्त होतात. त्यामुळे राज्य शिक्षण मंडळाच्या मुंबई विभागाच्या वतीने ‘तणावमुक्त परीक्षा अभियान’ राबविण्यात येणार आहे.मंडळाने याबाबतची २१ सूत्री कार्यक्रम पत्रिका तयार केली असून ‘विद्यार्थ्यांना आत्मविश्वासातून यशाकडे नेणारा’ हा उपक्रम असल्याचे या कार्यक्रम पत्रिकेत नमूद करण्यात आले आहे.

इंग्रजी-गणितानेच घात
दहावीच्या विषयांमध्ये इंग्रजी व गणितामुळेच विद्यार्थ्यांचा घात होतो आहे. मराठीचा निकाल ९४ टक्के लागला. हिंदीचा ९३ टक्के, तर प्रथम भाषा इंग्रजीचा ९६ टक्के निकाल आहे. मराठी माध्यमाच्या शाळांमधील इंग्रजीचा निकाल ८९.२३ टक्के आहे. गणिताचा निकाल सर्वात कमी ८२.४४ टक्के आहे. अन्य बहुतांश विषयांचा निकाल स्थिर आहे.

१०० टक्क्यांच्या शाळा वाढल्या
मराठी माध्यमाच्या शाळांचा निकाल ७८.९५ टक्के लागला, तर इंग्रजी माध्यमांच्या शाळांचा निकाल ९२ टक्के लागला. अर्थात, मराठीच्या शाळांमध्ये जिल्हा परिषद-पालिकेसारख्या स्वयंसेवी संस्थांच्या शाळांचाही समावेश आहे. २० ते ३० टक्के निकालाच्या दीड टक्के शाळा आहेत. ३० ते ४० टक्क्यांच्या १.३५ टक्के, ४० ते ५० टक्के निकालाच्या २.६२ टक्के शाळा आहेत. ९० ते ९९ टक्के निकालाच्या ३२.६८ टक्के शाळा आहेत.

‘ब्रेकिंग न्यूज’ला नोटीस
राज्यातील आठही विभागीय मंडळांचा निकाल सकाळी ११ वाजण्यापूर्वी जाहीर करण्यात येणार नाही, असा आदेश देण्यात आला होता. प्रसिद्धिमाध्यमांकडून तसे प्रतिज्ञापत्रही भरून घेतले जाते. प्रत्यक्षात मात्र नाशिक, कोल्हापूर आदी विभागांचा निकाल सकाळी दहा-साडेदहा वाजण्याच्या सुमारासच झळकला. राज्य मंडळाने या ‘विश्वासघाता’ची गंभीर दखल घेतली असून, संबंधित मंडळे व वाहिन्यांना नोटीस बजाविण्यात येणार आहे.

मुंबई विभागातील गुणवंत
सर्वसाधारण गट

१. सोनाली शांताराम चव्हाण (९६.४६) सरस्वती सेकंडरी स्कूल, ठाणे
२. शेफाली प्रदीप म्हाडदळकर (९६.३०) सरस्वती सेकंडरी स्कूल, ठाणे
संकेत दीपक पाटील (९६.३०) सेंट अ‍ॅन्थोनी हायस्कूल, वसई
निशिगंधा यशवंत केरूरे (९६.३०) बालमोहन विद्यामंदिर, दादर
३. तेजल संदेश प्रधान (९६.१५) ए. के. जोशी स्कूल, ठाणे
मृण्मयी पद्माकर जाधव (९६.१५) व्ही. एन. सुळे गुरूजी स्कूल, दादर
मागासवर्गीय
१. अंजली अनंत जाधव (९५.८४) अ. भि. गोरेगावकर विद्यालय, गोरेगाव
२. जयश्री सुरेश खांडेकर (९५.३८) भारती विद्यापीठ प्रशाला, कोकण भवन
३. धनश्री ज्ञानेश्वर गोसावी (९५.०७) बी. परांजपे विद्यालय, अंबरनाथ, ठाणे
प्रियांका प्रमोद दिवेकर (९५.०७) आदर्श विद्यामंदीर, उल्हासनगर, ठाणे
योगेश दिनकर राऊत (९५.०७) मुलुंड विद्यामंदिर, मुलूंड
रात्र शाळा
१. सोनल रामप्रकाश सिंग (८४.१५) कनोसा रात्र शाळा, माहिम
२. विवेककुमार सभामणी शर्मा (८४.००) पब्लिक रात्र शाळा, सांताक्रुझ
३. सरीता रामलौटन गुप्ता (८२.७६) राजहंस रात्र शाळा, डोंबिवली
अपंग
१. नवनीत बलराज मेहरोल (९४.६१) व्ही. एन. सुळे गुरुजी शाळा, दादर

अकरावी ऑनलाइन प्रवेशाचे वेळापत्रक
ऑनलाइन अर्ज भरणे व सादर करण २६, २७, २९ जून ते ३ जुलै
प्रवेश अर्जातील हरकती व त्रुटींची पुर्तता ४ व ६ जुलै
सर्वसाधारण गुणवत्ता यादी ७ ते १३ जुलै
पहिली गुणवत्ता यादी १४ जुलै
पहिल्या यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेश १५,१६,१७,१८ व २० जुलै
दुसरी गुणवत्ता यादी २४ जुलै
दुसऱ्या यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेश २५,२७, २८ जुलै
तिसरी गुणवत्ता यादी ३१ जुलै
तिसऱ्या यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेश देणे
व शुल्क स्वीकारणे १ व ३ ऑगस्ट
रिक्त जागांवर प्रवेश सुविधा ४ ऑगस्टपासून पुढे
संकेतस्थळाचा पत्ता : http://fyjc.org.in/mumbai

‘मराठी बीएमएम’ला अखेर मान्यता
मुंबई, २५ जून / प्रतिनिधी

मुंबई विद्यापीठातील ‘बॅचलर ऑफ मास मिडीया’ (बीएमएम) हा इंग्रजी भाषेतील अभ्यासक्रम यंदापासून मराठी माध्यमातून सुरू करण्यास उच्च व तंत्र शिक्षण विभागाने आज अखेर मान्यता दिली. मराठी दैनिकांची तसेच मराठी वृत्तवाहिन्यांची संख्या झपाटय़ाने वाढत आहे. या क्षेत्रात मराठी तरूणांना नोकऱ्यांच्या विपूल संधी आहेत. मराठी भाषेतील ‘बीएमएम’ अभ्यासक्रम पूर्ण करून विद्यार्थ्यांना या संधीचा फायदा घेता येईल, असे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री राजेश टोपे यांनी म्हटले आहे. इंग्रजाळलेल्या ‘बीएमएम’ अभ्यासक्रमातील अनागोंदीबद्दल ‘लोकसत्ता’ने सर्वप्रथम वृत्तमालिका प्रसिद्ध केली होती. ंतर मराठी अभ्यास केंद्राने या अभ्यासक्रमामध्ये सुधारणा करण्यासाठी पाठपुरावा केला. अभ्यासक्रम सुरू करण्यासंबंधी अधिक माहितीसाठी दीपक पवार (९८२०४३७६६५) व राममोहन खानापूरकर (९८२००४००६६) यांच्याशी संपर्क साधावा.

मराठी विषयासाठी प्रथमच पारितोषिके
नाटय़ाचार्य कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर पारितोषिक, मराठी प्रथम भाषा - तेजस्वी तानाजी पाटील, उषाराजे हायस्कूल, कोल्हापूर (१०० पैकी ९८ गुण).अग्रलेखाचे बादशहा नीलकंठ खाडिलकर पारितोषिक- मराठी द्वितीय/तृतीय भाषा इंग्रजी माध्यम, विषयात प्रथम - अक्षयकुमार विजय परब, डॉ. आंबेडकर विद्यालय, विक्रोळी, मुंबई (९८ गुण). विषयात द्वितीय - तनुश्री आनंद उपलेंचवार, माऊंट कार्मेल कॉन्व्हेंट, चंद्रपूर (९७ गुण). विषयात तृतीय - जयेश सुखदेव गुंजाळ, गांधी हायस्कूल, राजावाडी, विद्याविहार, मुंबई (९७ गुण).