Leading International Marathi News Daily

शनिवार, २७ जून २००९

‘मूनवॉकर’ मायकेल जॅक्सन काळाच्या पडद्याआड
लॉसएंजेलिस, २६ जून/पीटीआय

‘पॉप संगीताचा बादशहा’ म्हणून संपूर्ण जगाला परिचित असलेल्या मायकेल जॅक्सन याचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. आपल्या संगीताने कोटय़वधी रसिकांवर चांदण्यांची पखरण करणाऱ्या या कलाकाराचे असे अकाली जाणे सर्वानाच चटका लावून गेले. त्याचे वय मृत्युसमयी अवघे पन्नास वर्षे होते. मायकेल जॅक्सनचा ‘धीस इज इट’ या मैफलीच्या माध्यमातून पुन्हा एकदा आपली कला रसिकांच्या चरणी रुजू करणार होता, पण त्याच्या काही आठवडे अगोदरच त्याने या जगाचा निरोप घेतला. मायकेल : मॅजिकल थ्रिलर (अग्रलेख)

मायकेल.. मेरी आवाजही पहचान हैं!
राज ठाकरे

मायकेल जॅक्सन याच्या आकस्मिक मृत्यूमुळे एक लिजंड गेला.. ग्रेट कलावंत गेला.. ज्या काळी मायकेल जॅक्सन जग गाजवत होता , जगातील करोडो चाहत्यांच्या हृदयाची धडकन बनला होता त्या ऐन बहराच्या काळात मायकेलचे भारतात, महाराष्ट्रात आणि त्यातही मुंबईत येणे म्हणजे आश्चर्याच्या पलीकडचे होते. मायकेलचं गाणं आणि त्याच्या डान्सवर आपली जान कुर्बान करून टाकणाऱ्या जवाँ पिढीसाठी तर साक्षात मुंबईत देवच अवतरत होता.


अलविदा मायकेल!
मायकेल जॅक्सनचं निधन झालं. वय ५० म्हणजे तसं फार नाही. मायकेल जॅक्सन हा पॉप संगीतातला दादा माणूस. त्याच्या व्यक्तिगत आयुष्याविषयी सांगायचं तर ‘सेलेब्रिटी’ च्या समस्येनं तो ग्रासलेला होता. काही काळ शिखरावरून फेकला गेल्यानंतर तो पुन्हा ते स्टेटस मिळवण्याच्या प्रयत्नात होता त्याचं दडपण कदाचित त्याच्यावर आला असावं त्यातच त्याचा मृत्यू झाला. त्याने ड्रग्जचा ओव्हरडोस घेतल्याचंही बोललं जात आहे. त्याच्या घरात मरलिन मन्रोचा पुतळा आहे. हॉलिवूड स्टार चार्ली चॅप्लिनने ही मायावी चित्रपटसृष्टी सोडली व एकांतात गेला, त्याचा मायकेलने अभ्यास केला होता. योगायोग असा, की सेलिब्रिटी असलेल्या मायकेलवरही एकांतात जाण्याची वेळ आली. मायकेलचा विवाह एलव्हिस पर्सले यांच्या मुलीशी झाला होता.

मान्सूनने संपूर्ण महाराष्ट्र व्यापला
मुंबईत पहिलाच दमदार पाऊस

मुंबई, २६ जून / खास प्रतिनिधी
मुंबईत दोनच दिवसांपूर्वी दाखल झाल्यानंतर आता मान्सूनने जवळजवळ संपूर्ण महाराष्ट्र व्यापला. मुंबईत आज या हंगामातील पहिलाच दमदार पाऊस पडला, तसेच कोकणातही ठिकठिकाणी चांगला पाऊस झाला. राज्याच्या इतर भागात मात्र त्याचा विशेष जोर नव्हता. येत्या दोन दिवसांत कोकणात काही ठिकाणी मोठय़ा पावसाचा इशारा देण्यात आला आहे, तर राज्याच्या इतर भागात हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.

सरकारचा खोटारडेपणा उघड
मुख्य सचिवांना हायकोर्टाची नोटीस
मुंबई, २६ जून/प्रतिनिधी
सोलापूर जिल्ह्याच्या सांगोला तालुक्यातील सर्व १०२ गावांना नळ योजनांद्वारे पुरेसे पाणी बारमास पुरविण्यात येते असे प्रतिपादन करणाऱ्या आपल्या प्रतिज्ञापत्राच्या पुष्ठय़र्थ सरकारतर्फे करण्यात आलेल्या प्रतिज्ञापत्रासोबत तीन गावांच्या सरपंचांच्या बनावट स्वाक्षऱ्या असलेली पत्रे सादर केल्याचे चौकशीअंती निष्पन्न झाल्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाने मुख्य सचिवांसह सहा सरकारी अधिकाऱ्यांना न्यायालयीन बेअदबीबद्दल (कन्टेम्प्ट ऑफ कोर्ट) फौजदारी कारवाई करण्याची नोटीस काढली.

मुंबई, २६ जून / प्रतिनिधी
अकरावीसाठी ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत असल्याचा गाजावाजा करणारा शालेय शिक्षण विभाग आज पहिल्याच दिवशी तोंडघशी पडला. सकाळी जेमतेम तीन तास ऑनलाइन अर्ज सादरीकरणाची प्रक्रिया सुरळीतपणे पार पडल्यानंतर दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास संकतेस्थळाचे तीनतेरा वाजले. या प्रकाराच्या निषेधार्थ ‘महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेने’च्या कार्यकर्त्यांनी एमकेसीएलच्या कार्यालयात घुसून तोडफोड केली. एवढे रामायण होऊनही प्रवेशासाठी इच्छुक असलेल्या सुमारे तीन लाख विद्यार्थ्यांपैकी ४८ हजार विद्यार्थ्यांनी दिवसअखेर आपले ऑनलाइन अर्ज यशस्वीपणे भरल्याचा दावा शिक्षण विभागाने केला आहे.

‘ऑनलाईन’ प्रवेशप्रक्रियेला एक दिवस मुदतवाढ
औरंगाबाद, २६ जून/खास प्रतिनिधी

मुंबईत अकरावी प्रवेशप्रक्रिया ऑनलाईन सुरू असताना ‘सव्र्हर डाऊन’ झाल्याने यंत्रणा पूर्णपणे कोलमडली होती. अकरावीच्या ऑनलाईन प्रवेशाची मुदत आज एका दिवसाने वाढविण्यात आल्याची घोषणा शालेयमंत्री राधाकृष्ण विखे यांनी आज केली. जिल्हा नियोजन मंडळाच्या बैठकीनंतर विखे पत्रकारांशी बोलत होते. मुंबईत अकरावी प्रवेशासाठी अर्ज ‘ऑनलाईन’ भरण्याचा आज पहिला दिवस होता. ‘सव्र्हर डाऊन’ झाल्याने प्रवेशाचा गोंधळ झाला. विद्यार्थ्यांना हे अर्ज भरताना अडचणीही आल्या. यासंदर्भात बोलताना विखे म्हणाले, ‘‘आज दुपारी प्रवेशप्रक्रिया एक तास बंद पडली होती. अमेरिकेहून आयात केलेले ‘सव्र्हर’ पर्याय म्हणून उपलब्ध होते. त्यानंतर ही प्रक्रिया सुरळीत झाली. ‘सव्र्हर’ची क्षमता वाढविण्यात आली. आज सकाळपासूनच विविध केंद्रांवर मुंबईत रांगा लागल्या होत्या. एकाच वेळी विद्यार्थ्यांनी लॉग-इन केल्यामुळे सव्र्हर डाऊन झाला.’’ही प्रक्रिया सुरळीत पार पाडल्यानंतर पुढील वर्षी याची अंमलबजावणी राज्यभर करण्याचा मनोदयही श्री. विखे यांनी बोलून दाखविला. मुंबईत विद्यार्थ्यांना ऑनलाइन दीडशे महाविद्यालयांचा पर्याय उपलब्ध करून दिला आहे. आरक्षणनिहाय अकरावी प्रवेशप्रक्रिया मुंबईत यापूर्वी झालेली नव्हती. यंदा मात्र आरक्षणनिहाय प्रवेश दिला जाणार आहे, असे त्यांनी सांगितले.

युवराजचे शतक
किंग्स्टन, २६ जून / वृत्तसंस्था

युवराजसिंगच्या १०२ चेंडूतील १३१ धावांच्या तडाखेबाज खेळीमुळे भारताने विंडीजविरुद्ध सलामीच्या एकदिवसीय लढतीत ५० षटकांत ६ बाद ३३९ धावसंख्येपर्यंत मजल मारली. सुरुवात अतिशय संथ करणाऱ्या युवराजसिंगने अर्धशतकानंतर मात्र तुफान फटकेबाजी केली. ७ षटकांर व १० चौकारांसह त्याने १३१ धावा फटकाविल्या. विशेषत: ३४ व्या षटकात भारताने पॉवर प्ले घेतला आणि युवराज विंडीज गोलंदाजांवर तुटून पडला. त्याआधी कार्तिकच्या ७७ चेंडूंतील ६७ धावांमुळे भारताने २ बाद ३२ नंतर दमदार मजल मारली. कार्तिकने युवराजसोबत १३५ धावांची भागीदारी केली. युवराजने धोनीसोबत ८६ धावांची भागीदारी रचली. भारताच्या डावात एकूण १४ षटकार हाणले.

दीपक मानकरना कोर्टात हजेरीचा आदेश
मुंबई, २६ जून/प्रतिनिधी

पुण्यातील जमीन बळकाव प्रकरणातील आरोपी, निलंबित नगरसेवक आणि पुणे शहर काँग्रेसचे उपाध्यक्ष दीपक मानकर यानी अटकपूर्व जामिनासाठी केलेल्या अर्जावर उच्च न्यायालयात येत्या मंगळवारी सुनावणी होणार असून त्यावेळी न्यायालयाने मानकर यांना हजर राहण्यास सांगितले आहे. पुणे सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन नाकारल्यानंतर त्यांना फरारी घोषित करून त्यांची मालमत्ता जप्त करण्यासाठी पोलिसांनी कारवाई सुरु केली आहे. या पाश्र्वभूमीवर मानकर यानी उच्च न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला आहे. आज हा अर्ज न्या. दिलीप भोसले यांच्यापुढे आला तेव्हा त्यास उत्तर देण्यासाठी सरकारतर्फे वेळ मागितला गेला. त्यानुसार वेळ देऊन मंगळवारी सुनावणी ठेवली गेली व त्या दिवशी मानकर यांनी जातीने न्यायालयात हजर राहावे, असे निर्देश दिले गेले. तोपर्यंत मानकर यांना अंतरिम संरक्षण दिले गेले, ही त्यांच्यातर्फे ज्येष्ठ वकील अशोक मुंदरगी यांनी केलेली विनंतीही न्यायालयाने मान्य केली व ३० जूनपर्यंत त्यांना अटक करू नये, असा तातापुरता आदेश दिला. सरकारतर्फे सहाय्यक पब्लिक प्रॉसिक्युटर श्रीमती िशदे काम पाहात आहेत.

 


महाराष्ट्राचा आखाडा संदर्भातील बातम्या वाचण्यासाठी वरील इमेजवर क्लिक करा, त्याचप्रमाणे या बातम्यांवरील आपली प्रतिक्रिया ऑनलाईन नोंदविण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा.

 

प्रत्येक शुक्रवारी