Leading International Marathi News Daily

शनिवार, २७ जून २००९

(सविस्तर वृत्त)

मॅरेथॉन स्पर्धेत लाखाची बक्षिसे
नांदेड, २६ जून/वार्ताहर

दिवंगत ज्येष्ठ नेते डॉ. शंकरराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त शहर जिल्हा युवक काँग्रेसने आयोजित

 

केलेल्या मॅरेथॉन ‘जय हो’मध्ये यावर्षी एक लाखापेक्षा अधिक बक्षिसे ठेवण्यात आली आहेत, अशी माहिती संयोजक व नगरसेवक मुन्ना अब्बास यांनी आज पत्रकार बैठकीत दिली.
मॅरेथॉन ‘जय हो’चा बक्षीस वितरण सोहळा १४ जुलैला सकाळी ११ वा. मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते होणार असून याप्रसंगी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस खासदार जितेंद्रसिंग, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष खासदार भास्करराव पाटील-खतगावकर, प्रदेश युवर काँग्रेसचे अध्यक्ष राजीव सावत, मुंबईचे आमदार भाई जगताप, जिल्हा परिषद अध्यक्षा वैशाली चव्हाण, शारदा भवन शिक्षण संस्थेचे सचिव डी. पी. सावंत, नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेचे महापौर उपस्थित राहणार आहेत.
तत्पूर्वी १४ जुलैला सकाळी ९ वा. खासदार जितेंद्रसिंग हे मॅरेथॉन स्पर्धेस हिरवा झेंडा दाखवून प्रश्नरंभ करतील स्पर्धेत भाग घेण्यासाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारले जाणार नाही तसेच सर्व स्पर्धकांना युवक काँग्रेसच्या वतीने मोफत टी-शर्टचे वाटप करण्यात येईल. इच्छुक स्पर्धकांनी शहर युवक काँग्रेस कार्यालयात आपल्या नावाची नोंदणी करावी, असे आवाहन मुन्ना अब्बास यांनी केले आहे.