Leading International Marathi News Daily

शनिवार, २७ जून २००९

(सविस्तर वृत्त)

रिक्षाचा धक्का लागल्याने वाद; जालन्यात तणाव
जालना, २६ जून/वार्ताहर

रिक्षाचा धक्का लागल्याचे निमित्त होऊन उद्भवलेल्या वादामुळे शहरात आज काही काळ तणाव

 

निर्माण झाला. जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप कर्णिक व त्यांच्या सहकाऱ्यांनी दक्षता घेतल्याने वातावरण शांत झाले आणि दिवसभर शहरातील जनजीवन सुरळीत राहिले.
सदर बाजार पोलिसांनी सांगितले की, आज सकाळी ७.३० वाजता एका रिक्षाचा सोनू अर्जुन भगन यास धक्का लागल्याने त्यांच्यात वाद झाला. हे भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या अब्दुल रज्जाक अब्दुल कच्छी यास काही जणांनी मारहाण केली. त्यानंतर मंगळबाजारातील एका उपाहारगृहावर एका जमावाने हल्ला केला. तीन रिक्षांच्या काचाही फोडण्यात आल्या. चमडाबाजार भागात दोघांना मारहाण झाली. एका मोटारसायकलीची नासधूस करण्यात आली.
घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनाच धमक्या देऊन धक्काबुक्की करण्यात आली. त्यात एक पोलीस शिपाईही जखमी झाला. पोलिसांनी महेमूद कुरेशी याच्यासह १७ जणांविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे.
मंगळबाजार राजकीय वैमनस्यातून हॉटेलची तोडफोड केल्याच्या आरोपावरून धीरज भगत आणि अन्य जणांविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे.